जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची माहिती

 

बीड | वार्ताहर

बीड: इतर जिल्ह्यात अडकलेल्या विद्यार्थी, मजुरांना बीड जिल्ह्यात परत येण्यासाठी तसेच बीड जिल्ह्यातून इतर राज्यात/जिल्ह्यात जाण्याकरिता किंवा इतर राज्यातून/जिल्ह्यातून पर्यटक / विद्यार्थी / यात्रेकरू / कामगार / इतर यांना बीड जिल्ह्यात परत येण्याकरिता  माहिती भरण्याकरिता जिल्हाधिकारी
कार्यालयाने 

 

https://t.co/hnuxpTJyVY 

https://t.co/evXQXbiOyq https://twitter.com/CollectorBeed/status/1256680076076253184?s=20

 

 ही लिंक दिली असून त्या आधारे आपली माहिती भरून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान फॉर्म भरण्यापूर्वी पुढील  बाबींची नोंद घ्यावी असेही कळविण्यात आले आहे.

◆महाराष्ट्र शासनाने दि ३०/४/२० रोजीच्या पत्राद्वारे बाहेरच्या जिल्ह्यात /राज्यांत अडकलेल्या व्यक्तींना स्व जिल्ह्यात जाण्यासाठी अटी /शर्तीच्या आधीन राहून परवानगी दिली आहे.

◆बीड जिल्हा प्रशासनाद्वारे Lock Down कालावधीत जिल्हयाबाहेर अडकलेल्या नागरिकांना जिल्ह्यात परत आणणे व बीड जिल्ह्यात अडकलेल्या इतर जिल्ह्यातील नागरिकांना स्वगृही परत पाठविण्याकरिता सदर नागरिक स्थानांतरण सुविधा जिल्हाधिकारी कार्यालय बीडच्या वतीने कार्यन्वित करण्यात आली आहे. यासाठी अर्जदाराकडे गुगल लोगिन असणे आवश्यक आहे.

◆ज्यांनी https://covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर अर्ज भरलेला आहे त्यांनी या याठिकाणी पुन्हा अर्ज भरणे अपेक्षित आहे.

◆यासाठी प्रत्येकाला सध्या राहात असलेल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिथे जायचे आहे त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या दोघांचीही परवानगी लागेल.

◆तसेच स्वत: व्यवस्था केलेल्या वाहनाचा वाहतूक परवाना सुद्धा लागेल.यासाठी सदरील गाडी ज्या जिल्ह्यातून निघणार आहे त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी दिलेला वाहतूक परवाना असणे आवश्यक आहे.जर आपण वाहनाची व्यवस्था करू शकत नसाल तरआपल्यासाठी कोणतीही तरतूद करण्याची सध्या सुविधा नाही.

◆अतितातडीच्या कारणासाठी (वैद्यकीय इत्यादी) पोलीस विभागामार्फत चालू असणारी पास व्यवस्था नेहमीप्रमाणेच चालू राहील.

◆ईतर जिल्ह्यामधून येणाऱ्या सर्व व्यक्तींना चालकासह २८ दिवस Home Quarantine करण्यात येईल. सबब आपल्या येण्यामुळे आपल्या घरातील वयस्कर व्यक्ती आणि १८ ते २० वर्षे वयापर्यंतच्या व्यक्तीना खूप जास्त धोका होऊ शकतो याची जाणीव आपण ठेवावी.म्हणून अतिशय आवश्यक असेल तरच आपण या सुविधेचा वापर करावा आणि आपण येण्याआधी आपल्या घरामध्ये किमान १ महिना पुरेल एवढे किराणा इत्यादी साहित्य असण्याची खात्री करावी.

◆Hotspot ,Containment Zone , Buffer Zone ,Cluster Area यामधील व्यक्तींना बीड जिल्ह्यात येण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

◆सर्व अर्जदारांनी आरोग्य सेतू App आपल्या मोबाईलवर इंस्टाल करूनच खालील अर्ज भरावे. अन्यथा आपला अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

◆अर्जदारांनी भरलेल्या माहितीमध्ये किंवा कागदपत्रामध्ये थोडीही असत्यता आढळून आल्यास अर्ज तात्काळ नाकारण्यात येईल आणि अर्जदारावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, गुन्हा सुद्धा दाखल करण्यात येईल.

◆एकदा परवानगी नाकारलेल्या अर्जदाराचा अर्ज त्याने परत सादर केला तरीही मान्य करण्यात येणार नाही.सबब अर्जदारांनी संपूर्ण माहिती खरी भरावी आणि जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.