पिपंरखेड बु. गावात डेंगुचे ३ रुग्न सापडले
कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी घनसांवगी तालुक्यातील पिपंरखेड बु. गावात डेंगुने थैमान घातले आहे माेक्षदा दाभाडकर,तेजस्वीनी दाभाडकर,किजंन वाघमारे या तिन्ही मुलींना डेगुची लागन झाली आहे आणी त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गेल्या महीन्यापासुन वातावरणातील बदलामुळे डासाचे प्रमाण वाढले आहे ग्रामपंचायत व आराेग्य विभाग सुस्त असल्याचा आराेप गावकर्यांनी केला आहे.
काेराेणा मुळे गावात लॉकडाउन आहे आधीच एवढ्या माेठ्या विषाणुच्या संकटात गावकरी भयभीत झाले असुन त्यात डेंगुची भर पडली आहे .
ग्रामपंचायत सदस्य अनिल सानप यांनी उपसरपंच विष्णु रक्ताटे यांना निवेदन दिले आहे या निवदेनात म्हटले आहे की लवकरात लवकर उपाययोजना करावी,औषध फवारणी ,डेंगु सर्वेक्षण करुन तात्काळ पिंपरखेड येथील उपकेंद्रात सरकारी आराेग्य यंञना कार्यान्वित करावी.
या निवेदनानर ग्रामपंचायत सदस्य अनिल सानप ,शिवाजी मिसाळ गणेशराव सिरसाट,
धर्मराज आंधळे,बापु घाडगे,राज रक्ताटे, यांच्या सह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
[ पिंपरखेड बु मी वंसत दाभाडकर येथील रहिवाशी माझी मुलगी मोक्षदा हिस डेंगु आजाराची लागन झाली असून जालना येथील सिध्दीविनायक हॉस्पिटल मध्ये सध्या उपचार सुरू आहेत .
Leave a comment