3 नमुने रिजेक्ट तर 33 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित
जालना
कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि.13 मार्च 2020 पासुन लागु करण्यात आलेला असून त्याअनुषंगाने शासन निर्देशानुसार दि. 1 मार्च 2020 नंतर परदेश प्रवासावरुन आलेल्या नागरीकांची आरोग्य तपासणी व आवश्यकतेनुसार अलगलीकरण किंवा विलगीकरण करणे अत्यावश्यक आहे. तरी सर्व नागरीकांनी परदेशात प्रवास केल्याची माहिती प्रशासनास देऊन स्वत:ची व आपल्या कुटुंबियांची तपासणी सामान्य रुग्णालय, जालना येथे करुन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले. दरम्यान जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी कोरोना विषाणु संबंधित सर्व मुख्याधिकारी नगर परिषद, पंचायत यांची आढावा बैठक घेऊन संशयीत रुग्ण व त्यांच्या सहवाशितांची स्थानिक आरोग्य पथकांमार्फत तपासणी करुन लक्षणानुसार अलगलीकरण किंवा विलगीकरणाबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देत सर्व सहवाशितांचा किमान 14 दिवस पाठपुरावा करण्यात यावा. या दृष्टीने कार्यक्षेत्राचा कृतिक्षेत्राचा कृति आराखड्याची रंगीत तालिम घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
Leave a comment