जालना (प्रतिनिधी) ः
राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 3 जालना येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी हे नियमीत कायदा व सुव्यवस्था राखण्याकरीता जिल्हयात, राज्यात, राज्या बाहेर तसेच नक्षलग्रस्त भागामध्ये आपले कर्तव्य बजावण्या करीता वर्षातील एकुण दिवसा पैकी 80 टक्के दिवस कर्तव्या करीता हे कुंटूंबीया पासुन बेगळे असतात.
सध्या जगात कोरोना विषाणुने थैमान घातले असुन भारतात व महाराष्ट्रात कोरोना लागन झालेल्यांची संख्या वाढतच चालली आहे. तसेच प्रत्येक राज्यात व जिल्हयात लॉकडाऊन असुन गोरगरीब कुंटूंबीय तसेच बेघर गरजुंना दैनंदिन जिवन जगणे देखील आवघडच झाल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. अशा परिस्थीत राष्ट्रहीत लक्षात घेता केंद्र सरकार, राज्य सरकार कडुन वेळोवेळी आव्हाने करण्यात येते आहे. गोरगरीब कुंटूंबीय तसेच बेघर गरजुंना प्रशासकीय मदत व इतर संस्थांकडूनही या कुंटूंबीयांना मदत करण्यासाठी हात पुढे येतांना दिसत आहे.
दरम्यान या परिस्थीतीत कोरोणा विषाणुशी दोन हात करण्यासाठी राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 3 जालना या आस्थापनेवरील पोलीस जवान तसेच मुळघटकांशी नाळ जुळलेले पोलीस जवान यांनी गरजु कुंटूंबीयाना दैनंदिन जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या अन्नधान्य साहीत्यांची (100) राशन किट तयार करुन जवळ पास जालना शहरातील
परिसरातील 100 कुंटूंबीयांना वाटप केली आहे. यापुढेही (200) राशन किट वाटप करण्याचा मानस देखील पोलीस जवानांनी ठेवला आहे.
Leave a comment