औरंगाबाद डाक विभागातर्फे हेड पोस्ट ऑफिस व चिकलठाणा औद्योगिक पोस्ट ऑफिस परिसरातील रोजंदारी कामगार जे लॉक डाऊन मुले घराबाहेर जाऊ शकत नाही व रोज कमावणे रोज उदरनिर्वाह करणे बिकट झालेल्या गरजू लोकांना औरंगाबाद डाक विभागाने मदतीचा हात देऊन थोडा का होईना दिलासा दिला. दिलेल्या धान्य मध्ये तांदूळ, पीठ, डाळ, गोडतेल, साबण,मीठ अश्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता.
याप्रसंगी औरंगाबाद डाक विभागाचे प्रवर अधीक्षक श्री जी शिव नागराज यांनी विशेष पुढाकार घेऊन तसेच श्री शेख असदुल्ला सहाय्यक अधीक्षक मुख्यालय, सुनील कोळी पोस्टमास्टर औरंगाबाद हेड पोस्ट ऑफिस यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी श्री संजय ताठे, श्री बोरसे, श्री शेख शकील, श्री अहिरे आदी कर्मचारी उपस्थित होते.
Leave a comment