जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे गोर्डेंची मागणी

पैठण । वार्ताहर

येथे महाराष्ट्र शासनाने तीनशे एकर परिसरात संत ज्ञानेश्वर उद्यानाची उभारणी जायकवाडी जलाशयाच्या पायथ्याशी केलेली आहे . जायकवाडी धरणाच्या वेळी उद्यानाची उभारणी केल्यानंतर उद्यानाला आवश्यक त्या प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत .उद्यानाच्या विकासासाठी कोणताही पाठपुरावा केला नाही त्यामुळे भक्कम असा निधी प्राप्त झाला नाही . म्हणून संत ज्ञामेश्वर उद्यानाची बकाल अवस्था झाली आहे . उद्यान सुरू करण्यासाठी तातडीने पाच कोटी देण्यात यावे . अशी मागणी माजी नगराध्यक्ष दत्तात्रय पाटील गोर्डे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनावर 15 सप्टेंबर रोजी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की संत ज्ञानेश्वर उद्यान पाहण्यासाठी पूर्वी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत होते . परंतु उद्यानाची देखभाल न झाल्याने उद्यानाची बकाल अवस्था झालेली आहे . त्यामुळे पर्यटकांची संख्या पूर्णपणे घटली असून उद्यानाला गायराणाचे स्वरूप आले आहे . पैठण शहरातील उद्योगधंद्यावर त्यामुळे परिणाम झाला आहे . उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी स्वतंत्र बजेट देण्याची घोषणा विधान सभेत केली होती .त्यामुळे उद्यानाच्या विकासाच्या दृष्टीने व उद्यानातील संगीत कारंजे व इतर सुविधा पुरवण्यासाठी तातडीने पाच कोटी रुपये देण्यात यावे.

संत ज्ञानेश्वर उद्यानाची पाहणी दि 12 सप्टेंबर रोजी मुख्य सचिव संजय कुमार व मंत्री संदीपान भुमरे यांनी पाहणी केली . परंतु उद्यानाचा डीपीआर मंजुरीसाठी मागणी केलेला आहे .त्यास मंजूर होण्यास खूप कालावधी लागणार आहे . सध्या उद्यान शेवटची घटिका मोजत आहे .  त्यामुळे नादुरुस्त कारंजे , वॉकिंग ट्रक व  इतर कामे केली तर उद्यान पूर्व पदावर येईल म्हणून तात्काळ पाच कोटी रुपये देऊन संत ज्ञानेश्वर उद्यान वाचवण्याची गरज असल्याची खंत माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी व्यक्त केली .

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.