माजलगाव प्रतिनिधी 

बीड जिल्हा लाल बावट्याचा बालेकिल्ला म्हणून पूर्वी ओळखला जायचा याच बीड जिल्ह्याने सन १९६७  साली थोर स्वातंत्र्य सेनानी प्रति सरकारचे संस्थापक क्रांतिसिंह नाना पाटील यांना लोकसभेत पाठवले, त्यानंतर स्वातंत्र्यसेनानी माजी खासदार गंगाधर आप्पा बुरांडे यांनी देखील जिल्ह्याचे नेतृत्व केले, त्यानंतर गेवराईतून माजी आमदार भाई पवार, चौसाळा मतदारसंघातून माजी आ. भाई जनार्दन तुपे तर बीड विधानसभेत माजी आ.कॉम्रेड काशिनाथराव जाधव यांच्यासह अनेक  लालबावट्याचे आमदारही निवडून आले, त्यामुळे बीड जिल्हा लालबावट्याचा बालेकिल्ला समजला जात असे, सन २००४ साली शेकापच्या भाई थावरेंनी याच मतदारसंघात तब्बल ३५ हजार मते मिळवली होती. तर माजलगाव मतदार संघात चौसाळा मतदार संघातील वडवणी व धारूर तालुक्याचा समावेश झालेला असल्याने वडवणी, धारूर या  तालुक्यात  शेतकरी कामगार पक्षाला मानणारा खूप मोठा वर्ग आहे. माजलगाव मतदार संघात २०१९ साल च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस,शेतकरी कामगार पक्ष आघाडीच्या आ.प्रकाश सोळंके यांना माजलगाव मतदार संघातील जनतेने शरदचंद्रजी पवार साहेब आणि पुरोगामी विचाराचे प्रतिनिधी म्हणून  विजयी केले परंतु त्यानंतर आ.प्रकाश सोळंके यांनी अवघ्या काही तासात पहाटेच्या शपथविधीला पाठिंबा दर्शवून भारतीय जनता पक्षाला सहकार्य करण्याची भूमिका घेऊन माजलगाव मतदार संघातील जनतेचा विश्वासघात केला होता, पुढे ईडीच्या भीतीमुळे अजित पवार यांनी भाजप सोबत जाण्याचा घेतलेल्या निर्णयाला संमती दर्शवत आ. प्रकाश सोळंके हे भाजप सोबत गेलेल्या राष्ट्रवादीच्या गटात ईडीच्या भीतीपोटी सामील झाले, केवळ सत्तेचा माग धरून काम करणाऱ्या आमदार प्रकाश सोळंके यांनी माजलगाव मतदार संघातील जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून जनतेला वाऱ्यावर सोडण्याचे पाप केले,परंतु माजलगाव मतदार संघात शेतकरी, कष्टकरी,  सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नावर शेतकरी कामगार पक्षाचे लढाऊ नेते भाई ॲड. नारायण गोले पाटील यांनी आपल्या आक्रमक भूमिकेने अनेक मोर्चे , आंदोलने करून प्रशासनासह शासनाला धारेवर धरत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत, शेतकऱ्यांची खते बी बियाण्या मध्ये होणारी लूट, प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून होणारी लूट थांबवण्याचे काम शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड नारायण गोले पाटील यांनी केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा माजलगाव विधानसभेचा आश्वासक चेहरा म्हणून  जनसामान्यात, शेतकऱ्यांमध्ये त्यांची चांगली प्रतिमा असून सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढणारे धडाडीचे नेते म्हणून त्यांची ओळख सबंध मतदार संघात आहे, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक प्रस्थापित राजकीय नेते विविध राजकीय पक्षाची उंबरठे झिजवत असताना प्रमाणिकपणे चळवळीत काम करणारा, धाडसी कार्यकर्ता म्हणून भाई ॲड. नारायण गोले पाटील यांची वेगळी ओळख आहे, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत माजलगाव मतदार संघातील सर्व प्रस्थापित पुढारी भाजपच्या बाजूने असताना, महाविकास आघाडीच्या खा.बजरंग बप्पा सोनवणे यांना माजलगाव मतदार संघातून चांगले मताधिक्य मिळवून देण्यासाठी गावा- गावात-वाडी-वस्तीत जाऊन केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा पर्दापाश करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे, तसेच आगामी काळात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी तसेच माजलगाव मतदार संघातील शेकडो प्रलंबित प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड नारायण गोले पाटील यांच्यासारख्या तरुण तडफदार, प्रमाणिक नेतृत्वाची गरज आहे त्यामूळे महाविकास आघाडीचे नेते मा. शरदचंद्रजी पवार साहेब, मा. उद्धवजी ठाकरे साहेब, मा. नाना पटोले साहेब, भाई जयंत पाटील साहेब यांनी भाई ॲड. नारायण गोले पाटील यांच्यासारख्या शेतकरी कुटुंबातील लढवय्या नेत्यास माजलगाव विधानसभेची उमेदवारी द्यावी असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे भाई गणपतराव कोळपे यांनी केले असून लवकरच शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई जयंत पाटील यांना भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली माजलगाव मतदार संघातील शेतकरी कामगार पक्षाचे शिष्ट मंडळ भेटून मागणी करणार आहे तसेच बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड व माजलगाव मतदार संघातील शेतकरी कामगार पक्षाचे शिष्ट मंडळ यांची महाविकास आघाडीने शेतकरी कामगार पक्षाला माजलगाव मतदार संघ सोडण्याबाबत संयुक्त बैठक होणार असल्याची माहिती भाई गणपतराव कोळपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.