दादेगाव जहागीर येथील माजी सरपंचाचा प्रताप
पैठण । नंदकिशोर मगरे
तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्याने तेथे तुर्तास प्रशासकाची नेमणुक दि 11 रोजी करण्यात आली आहे .त्यातच दादेगाव जहागीर या ग्रामपंचायतीमध्ये देखील प्रशासक नेमला असून येथील सरपंच आजही पदावर असल्याचं भासवत प्रशासन व नागरिकांची दिशाभुल करत असल्याची बाब समोर आली असून या गंभीर प्रकारामुळे पदाचा हावडा कसा असतो तो या सरपंच पठ्ठ्याने दाखवून दिले आहे
याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील बहूतांश ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपला असून कोरोना साथीच्या पार्श्ववुमीवर तुर्तास निवणुका घेणं शक्य नसल्याने कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतीला प्रशासक नेमले आहेत .यात दादेगाव जहागीरचाही सामावेश आहे .ग्रामपंचायतीने गावासाठी राष्ट्रीय पेय जेल योजना राबवली असून तिचे उदघाटन आज दि 18 शुक्रवार रोजी राज्याचे फलोत्पादन व रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते पार पडणार आहे. मात्र सद्य स्थितीमध्ये प्रशासक असतांना देखील माजी सरपंच बाळकृष्ण गाडे यांनी प्रसिध्दी पत्रक व कॉन्सीलवर स्वताचे नाव माजी मध्ये न टाकता विद्यमान सरपंच म्हणून उल्लेख करत प्रशासन व नागरिकांची दिशाभुल केली आहे. असा हा बालीशपणा चव्हाट्यावर आणत नागरिकात या बाबत उलट सुलट चर्चेला उधान आले आहे. याबाबत माजी सरपंच बाळकृष्ण गाडे यांना संपर्क केला असता त्यांनी फोन उचलण्याची तसदी देखील घेतली नसून.अद्यापही सरपंच पदाचा तुरा स्वतामध्ये खोसून दिवा स्वप्नातून बाहेर पडण्यास हा महाशय तयार दिसत नाही एवढे मात्र खरे
Leave a comment