मिडीयाला खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रश्न
मुंबई । वार्ताहर
गेल्या अनेक वर्षांपासून एमआयएमचे नेते खासदार जलील हे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाला दांडी मारतानाच दिसत आहेत. यावरून शिवसेनेनं जलील यांच्यावर टीकाही केली आहे. तसेच, त्यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं वावडं आहे आणि ते स्वत:ला निजामाचे वारसदार समजतात अशा शब्दांत शिवसेनेनं जलील यांच्यावर निशाणा साधला होता. आता यंदा खूद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने जलील यांनी उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीवरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
मराठवाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमास माझी अनुपस्थिती म्हणजे राष्ट्रविरोधी आणि शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची अनुपस्थिती म्हणजे देशभक्ती का ? आता निष्ठेचे प्रमाणपत्र देणारे आणि मीडिया गप्प का आहे ?, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच, शिवसेनाप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमास येण्यास स्पष्ट नकार दिला. मराठवाड्याबद्दल माझ्या सचोटी आणि निष्ठेवर प्रश्न विचारणारे मुख्यमंत्र्यांना का विचारत नाही?, यालाच मी दुहेरी मापदंड म्हणतो, असंही ते म्हणाले. दरम्यान, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ऑनलाइन हजेरी लावली. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केलं. तसंच भविष्यात मराठवाडा दुष्काळग्रस्त होऊ नये म्हणून खबरदारी घेतली असल्याचंही ते म्हणाले
Leave a comment