औरंगाबाद । वार्ताहर
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस औरंगाबादच्या वतीने प्रदेश अध्यक्ष सुनिल गव्हाणे, शहर अध्यक्ष विजयराव साळवे मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रशांत कदम यांच्या नेतृत्वाखाली देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी साहेब यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त शहरातील कॅनॉट फ्लेस या ठिकाणी मोदीजींचा वाढदिवस त्यांच्या ‘आश्वासनाची पेटी’ चा केक कापून साजरा करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी साहेबांना रिटन गिफ्ट मध्ये आम्हाला तुमची आश्वासनाची पेटी बंद करून विद्यार्थी हिताचे शैक्षणिक धोरण, तरुणांना रोजगार द्या, बेरोजगारी थांबवा, विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळू नका, शिक्षणात तरी तुमचे राजकारण करू नका. अश्या मागण्याच्या घोषणा करण्यात आल्या.
Leave a comment