पत्रकारांना प्रवेश नाकारल्याचे प्रकरण प्रकरणात खाजगी
विहामांडवा । वार्ताहर
शहरातील संत ज्ञानेश्वर उद्यानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांच्या दौर्याचे वृत्तसंकलन करण्यासाठी पत्रकारांना मज्जाव करणार्या संबंधित अधिकार्यांनी हात झटकून सुरक्षारक्षकाला बळीचा बकरा बनविण्याचा प्रकार सुरू केल्याचे दिसून येत आहे . मुख्य सचिव संजयकुमार हे दि .12 सप्टेंबर रोजी येथील बंद असलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाची पाहणी करण्यासाठी आले . या दौर्याचे वृत्तसंकलन करण्यासाठी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उद्यान परिसरात गेले असता पैठण तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी पत्रकारांना उद्यानाच्या सुरक्षारक्षकाला तोंडी आदेश देऊन प्रवेश न देण्याचे सांगितले होते . त्यामुळे वृत्तसंकलन करण्यासाठी मज्जाव केल्याप्रकरणी पैठण येथील पत्रकारांनी मुख्य सचिव संजय कुमारांच्या दौर्याच्या वृत्तसंकलन वर बहिष्कार टाकून संबंधित अधिकार्याविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली होती . आता प्रकरण अंगलट येणार असल्याचे लक्षात येताच तहसीलदारांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांना संबंधित प्रकरणात चौकशी करून खाजगी सुरक्षारक्षकांना सेवेतून कमी करावे असा आदेश दिला आहे . दिल्यामुळे स्वतः केलेले कृत्य लपविण्यासाठी संबंधित अधिकारी सुरक्षा रक्षकाचा बळीचा बकरा करीत असल्यामुळे सुरक्षारक्षकात संताप व्यक्त करण्यात येत आहेत . पैठण पत्रकारांनी देखील राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिष्टमंडळाद्वारे समक्ष भेट घेण्याचे ठरविले आहे .
Leave a comment