जाङ्गराबाद । वार्ताहर

देशाचे  पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, त्या सेवा सप्ताहाला आज सुरवात करण्यात आली. याच सेवा सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर जाङ्ग्राबाद तालुक्यातील पहिला कार्यक्रम टेंभुर्णी जिल्हा परिषद गटातील संगमपूर येथे एका गरीब कुटुंबाला दवाखान्यासाठी मदत करून पार पडला.येथील चि. आदित्य ज्ञानेश्‍वर रगड वय 11 वर्ष या मुलाला घराच्या गॅलरीमध्ये एकटा खेळत असतांना अनावधानाने त्याचा हात विजेच्या मुख्य विद्युत वाहिनीस लागुन, विजेच्या शक्तीशाली धक्यामुळे त्याचा हात रक्तबंबाळ होवुन पुर्णपणे निकामी झाला असुन, त्याच्यावर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात वैद्यकिय उपचार करण्यात येत आहे.

घरची परिस्थिती हलाकीची आहे, ही बाब जेव्हा जाङ्ग्राबाद तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांच्या लक्षात आली तेव्हा, सेवा सप्ताहाच्या निमित्ताने सर्व पदाधिकार्‍यांनी मिळून 82 हजार 200 रुपयांची रक्कम जमा करून त्या मुलाच्या कुटुंबीयांकडे ही मदत सुपूर्द केली. यावेळी सुरेश जी दिवटे सर, संतोष पाटील लोखंडे, भाऊसाहेब पाटील जाधव, दगडुबा गोरे, राजेश पाटील चव्हाण, दत्तू पाटील पंडित, दीपक पाटील वाकडे ,जगन पाटील पंडित, अरुण पाटील अवकाळे, शेख कौसर, उद्धव पाटील दुनगहु, गजानन लहाने, डॉ.रविंद्र कासोद,राजू बर्‍हाटे, विजय बोर्‍हाडे, राजू बोर्‍हाडे, विष्णू रगड, अमोल वाघ, कृष्णा लहाने, निवृत्ती रगड, सुरेश ढाले, नारायण डुकरे, नागोराव लहाने इत्यादी सह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.