जालना । वार्ताहर

सध्या कोरोनाच्या काळात रक्तदान शिबिर होत नाही व रुग्णाची रक्त अभावी होत असलेले हाल यातून जालना येथील 21 वर्षांपासून कार्यरत गणेश चौधरी ब्लड डोनर ग्रुपने 3 दिवसांपूर्वी रक्तदानासाठीची हाक हा उपक्रम सोशल मीडियावर चालवला होता. या हाकेला मोठ्या प्रमाणात प्रतिसात मिळाला.  ब्लड डोनर ग्रुपचे गणेश चौधरी यांनी स्वतः 2 दिवसात 17  रक्तदात्यांना रक्तपेढीत येऊन रक्तदान केले तर सचिन शिंदे मित्र मंडळ तसेच लक्ष्मीकांत नगरकरांनी मिळून 29 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. या रक्तदान शिबिरचे वैशिष्ट्य म्हणजे सविता दिनेश भुतेकर ह्या महिलेने रक्तदान केले. 

कोरोना काळात हॉस्पिटल मधील शत्रक्रिया जरी होत नसेल तरी थालसीमिया, महिला प्रसूतीसाठी तर रक्ताची खूप गरज असते.  अशा वेळी रक्ताचा ङ्गार मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत असून गणेश चौधरी ब्लड डोनर ग्रुपने जो पुढाकार घेतला तो सर्व सामाजिक संघटनांनी घेतला पाहिजे असे आवाहन गणेश चौधरी यांनी केले. सदर शिबीराचे गणेश चौधरी ब्लड डोनर ग्रुपच्या नेतृत्वात करण्यात आले तर आयोजन सचिन शिंदे मित्र मंडळ, लक्ष्मीकांत नगर मित्रमंडळ यांनी रक्तदान करून शिबीर यशस्वी केले. जालना येथील श्री समर्थ रक्तपेढी यांनी रक्त संकलन केले असून ह्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गणेश चौधरी ब्लड डोनर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष गणेश चौधरी, सचिन शिंदे, प्रकाश भांगे उपस्थित होते तर सचिन धारकर, अनिल बुंदेले,आकाश कुलकर्णी,चंद्रकांत अखेतकर, सौ सविताताई भुतेकर, संदीप मगर, भागवत घारे, अनिकेत भुतेकर, ऋषिकेश खिरे, रामेश्‍वर गवळी, सौरभ देवकर, आकाश कावळे, बसदेव टकले, सचिन शिंदे, सौरभ राव, निकी अवसारमोल,दीपक मगर, अथर्व निकम, तरुनकुमार वलंबद्री, तौङ्गिक शेख, बळीराम डावकर, राजेश वाघमारे, भगवान जाधव, वेदांत डोईजर यांनी रक्तदान केले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.