औरंगाबाद । वार्ताहर

स्मार्ट सिटी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची आज बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात संपन्न झाली. बैठकीत राज्याचे एएससीडीसीएल चे चेअरमन तथा मुख्य सचिव संजय कुमार यांनी व्हिडीओ कॉनफरंसींगच्या माध्यमातून स्मार्ट सिटीचे सिईओ अस्तिककुमार पाण्डेय यांच्याशी संवाद साधला. आयुक्त यांनी झुलॉजिकल पार्क, जमा खर्च, सीसीटीव्ही कॅमेरे, स्मार्ट शहर बस, मनपाच्या प्रत्येक विभागात आधुनिक तत्रज्ञानाचा उपयोग केला जात असल्याची माहिती दिली.

स्मार्ट सिटी बसमध्ये आता स्मार्ट कार्डच्या माध्यमातून एक आठवडा, महीनाभराचा पास शहर बस मध्ये प्रवास करण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. बससेवा सुरु झाल्यानंतर औरंगपूरा, रेल्वेस्टेशन, सिडको बसस्थानक, हर्सूल स्टॉप वर स्मार्ट कार्ड उपलब्ध असणार आहे. स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाबाबत अधिक माहिती नागरिकांना हवी असल्यास पोर्टलवर मिळेल. या पोर्टलचे उद्घाटन या बैठकीत करण्यात आले. 

यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी स्थायी समीती सभापती जयश्री कुलकर्णी, माजी सभागृह नेता विकास जैन, भाजपाचे मा.गटनेता प्रमोद राठोड, भाऊसाहेब जगताप, शहर अभियंता एसडी पानझडे उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी ऑनलाइन सहभाग घेतला.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.