राज्याच्या मुख्य सचिवाच्या पाहणी दौर्‍यात पत्रकारांना केली मनाई 

तहसिलदार शेळके व अधिक्षक अभियंता काळे यांच्यावर केली कारवाईची मागणी 

पैठण । वार्ताहर

नंदकिशोर मगरे 

महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव  संजिव कुमार  यांचा दि 12 शनिवार रोजी पैठण शहरातील विविध विकास कामाच्या  पाहणी दौर्‍यात पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने संतप्त पत्रकारांनी सदरिल शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार घालत वृत्त संकलन नाही करण्याचा निर्णय   घेत तालुका प्रशासनाचा जाहिर निषेध केला. या बाबत अधिक माहिती अशी राज्याचे मुख्य सचिव संजिवकुमार यांचा दि 12 शनिवार रोजी विविध विकास कामाची व जायकवाडी प्रकल्प, संत ज्ञानेश्वर उद्यान आणी नाथ मंदिर परीसरातील डोम पहाणी दौरा नियोजीत वेळेवर होता. तसा सोशल मिडियाद्वारे तहसिलदार चंद्रकांत शेळके यांनी सर्व पत्रकार बांधवांना निरोपही मिळत होता. मात्र जेव्हा मुख्य सचिव संत ज्ञानेश्वर उद्यान पहाणी करण्यासाठी आले तेव्हा उद्यानच्या प्रवेशद्वारावर कार्य बजावत असणार्‍या सुरक्षा रक्षकांनी पत्रकरांना उद्यान मध्ये प्रवेश नाही दिला. त्याला कारण विचारले असता.अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे व तहसिलदार चंद्रकांत शेळके यांचा आदेश आहे की पत्रकारांना प्रवेश देवू नका असे  संबधीत सुरक्षारक्षकाने सांगितले.

राज्याचे मुख्य सचिव शहराच्या विकासाठी काय भरिव मदत करू शकतात याची उत्सुकता लागलेल्या विविध दैनिकाच्या  पत्रकारांनी एकत्र एवून रमेश लंबोरे व नानक वेदी यांच्या मार्गदर्शनाखाली वृत्तसंकलनावर सार्वजनिक बहिष्कार घालत मुख्य सचिव संजिव कुमार यांच्या नावाने निवेदन काढून अधिक्षक अभियंता राजेद्र काळे  व तहसिलदार चंद्रकांत शेळके यांच्यावर कारवाईची मागणी केली .तर पत्रकारांना बोलवायचेच नव्हते तर सोशल मिडियाद्वारे तहसिलदार शेळके यांनी  सचिवांच्या दौ-यांचे   संदेश  टाकलेच कशाला .लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची मुस्कटदाबी खपवून घेतली जाणार नाही असा निर्णय देखील पत्रकारांच्या निषेध बैठकीत घेण्यात आला या निवेदनावर विविध दैनिकाच्या प्रतिनिधीच्या स्वाक्षर्‍या आहेत 

चौकट 

शासकीय कार्यक्रमात पत्रकारांना प्रवेश नसतो शेळके व काळेंचा जावई शोध 

राज्याचे मुख्य सचिव संजिवकुमार यांच संत ज्ञानेश्वर उद्यानमध्ये आगमण झाल्याची बातमी कळताच विविध दैनिकाच्या प्रतिनिधींनी उद्यानाकडे वृत्तसंकलन करण्याच्या हेतूने धाव घेतली .प्रवेशद्वारावर जाताच सुरक्षा रक्षकाने सर्व पत्रकारांना आडवलं .सर्व विविध दैनिकाच्या प्रतिनिधीने सांगितले की आम्ही वृत्तसंकलन करण्यासाठी आलो आहोत तर त्यावर मिळालेलं उत्तर असं की हा शासकीय कार्यक्रम आहे .तुम्हाला इथे प्रवेश द्यायला वरिष्ठांची हरकत आहे .यावर जायकवाडी पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता काळे  यांना संपर्क साधला असता .त्यांनी तहसिलदार शेळके यांच्याकडे बोट दाखवत शेळकेंचा आदेश असल्याचे सांगितले खरे पण या दोन्ही अधिकार्‍यांनी हा जावाई शोध कुठून लावला की शासकीय कार्यक्रमात पत्रकारांना प्रवेश नसतो यावर अता संबधीत अधिकार्‍यांच्या बाबतीत उलट सुलट चर्चेला उधान आले आहे 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.