सोयगाव । वार्ताहर
सध्या शाळा बंद आहेत आपल्या विद्यार्थ्यांना आपण काहीतरी द्यावं या हेतूने झपाटलेल्या फुसे आर.डी.शिक्षण विस्तार अधिकारी बनोटी बिट, सचिन पाटील केंद्रप्रमुख गोंदेगाव , नितीन राजपूत बनोटी, राजकुमार निकोसे तिडका, उमेश महालपुरे वडगाव ति यांनी तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने स्पर्धा परीक्षेचा सराव दररोज ऑनलाइन शिष्यवृत्ती नवोदय वर्ग दिनांक 14 जुलै पासून सुरू केला हा वर्ग दररोज 6 ते 7 असतो बनोटी गोंदेगाव परिसर डोंगराळ असून या परिसरात मोबाईल नेटवर्क नसणे पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नसणे ,ज्या ठिकाणी रेंज आहे अशा ठिकाणी जसे टेकडीवर जावून ,काही शेतांमध्ये बसून विद्यार्थी वर्गात उपस्थित रहातात अनेक अडचणी असतानाही हा वर्ग व्यवस्थित रित्या सुरू आहे 25 ते 30 मोबाईल द्वारा साधारणतः 50 ते 60 विद्यार्थी या वर्गाचा लाभ घेत आहेत.
14 जुलै ते 16 आगस्ट या कालावधीत नवोदय इयत्ता 5 वी चा सर्व अभ्यासक्रम शिकवून संपला आहे व सध्या पुन्हा एकदा सगळ्या अभ्यासक्रमाचा सराव सुरू आहे हा सराव 15 तारखेंपर्यंत संपेल व त्यानंतर शिष्यवृत्ती वर्ग सुरू करणार असल्याचे सचिन पाटील व राजपूत यांनी सांगितले त्यांनी या उपक्रमाची पद्धत सांगितली दररोज संध्याकाळी 6 वाजेला एक समनव्यक नेमला आहे त्याकामी 1 विस्तार अधिकारी 4 ही केंद्रप्रमुख 1 तंत्रस्नेही शिक्षक समाधान चोपडे यांनी वारानुसार समन्वयक म्हणून काम बघायचे व दररोज नेमून दिलेल्या शिक्षकांनी यात अध्यापन करून विद्यार्थ्यांना त्यावर आधारित प्रश्न विचारायचे दररोज एक ते दीड तास हा अभ्यासक्रम वर्ग नियमितपणे सुरू आहे .या उपक्रमाचा जास्तीत विदयार्थ्यांनी फायदा घ्यावा असे अवाहन पालकांनाही करण्यात येत आहे या उक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक मोहितकर ,राम अडसूळ,योगेश उभाळे, स्वप्नील सूर्यवंशी, शरद पाटील, श्रीमती प्रिया पेटकर, वानखेडे , कांबळे, दीपक महालपुरे, कृष्णा पाटील, मयूर काळे हे तंत्रस्नेही शिक्षक परिश्रम घेत आहेत.
Leave a comment