वाहतूक पोलीस आणि आरटीओ विभागाचे याकडे दुर्लक्ष
औरंगाबाद । वार्ताहर
लॉक डाऊन संपताच औरंगाबादच्या रस्त्यावर पुन्हा रिक्षा वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र अप्पे रिक्षा चालकांची मुजोरी आणि मस्ती काही कमी झाली नाही शहरातील रस्त्यावरील रिक्षा चालकांच्या मस्तीने सर्वसाधारण औरंगाबादकर त्रस्त झाले असून या कडे वाहतूक पोलीस आणि आरटीओ विभागाने लक्ष घालण्याची गरज आहे. गेल्या अनेक महिन्यापासून लोकडाऊन मुळे रिक्षातूं न प्रवासी वाहतूक करणे बंद होते.मात्र अनलॉक ची प्रक्रिया सुरू झाल्याने शहरातील रस्त्यांवर पुन्हा आता रिक्षा वाहतूक सुरू झाली आहे.
चिकलठाणा ते बाबा पेट्रोल पंप महावीर चौक या रस्त्यावर चालणार्या अप्पे रिक्षांची दादागिरी पुन्हा सुरू झाली असून रस्त्यावर कुठेही हे चालक रिक्षा थांबत आहेत.तर रस्त्याने जाणार्या प्रवाशांचे हात ओढून रिक्षात बसविले जात आहे. एवढ्यावरच हे थांबत नाही तर प्रवाशांची ओढा-ओढी मध्ये दुसर्या रिक्षात बसलेल्या तरुणी-महिलाचे हात पकडून, पर्स ओढून त्यांना एका रिक्षांमधून उतरवत दुसर्या रिक्षा मध्ये बसण्यास भाग पाडत आहे . आज सकाळी एका तरुणी प्रवाशाला विचारले असता अदालत रोडवर एक रिक्षाचालक नशेत होता तर त्याने माझे हात पकडून मला रिक्षात बसविले तो एवढा मदधुंद होता की त्याला रिक्षा चालवताही येत नव्हती असे ती तरुणी म्हणाली.जर अशी स्थिती शहराची असेल तर खरच अशा टवाळखोर रिक्षा चालकांवर आता कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र वाहतूक पोलीस आणि आरटीओ विभाग या कडे दुर्लक्ष करीत आहे.त्यामुळे अशा गर्दुल्या रिक्षा चालकांचे मनोधैर्य उंचावत आहे. लवकरच यावर कारवाई केली गेली नाही तर येत्या काळात अनेक गंभीर प्रकार घडू शकतो.
Leave a comment