सोयगाव । वार्ताहर

सोयगाव शहरातील फर्दापूर रस्त्यावरील ओम साई पेट्रोल पंपाच्या साठवण टाकीचे कुलूप तोडून मंगळवारी मध्यरात्री दहा ते बारा अज्ञातांनी तीन लाख 22 हजार रु चे 4067 लिटर डीझेल अज्ञातांनी चोरी केल्याची खळबळजनक घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली आहे.या प्रकरणी सोयगाव पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.

सोयगाव शहराला लागून असलेल्या सोयगाव- फर्दापूर रस्त्यावरील पेट्रोल पंपावरील साठवण टाकीचे कुलूप तोडून दहा ते बारा अज्ञातांनी 4067 लिटर डीझेलची चोरी केल्याची फिर्याद पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक सुरेश घन यांनी बुधवारी दिली आहया प्रकरणी सोयगाव पोलीसांनी बुधवारी घटनेचा पंचनामा केला असता त्यांना घटनास्थळावर तोडलेले कुलूप आणि काही संशयित साहित्य आढळून आले.फिर्यादीवरून सोयगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या दहा ते बारा टोळक्यांच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहा.पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट,पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे,जमादार संतोष पाईकराव,दिलीप तडवी,सागर गायकवाड,संदीप चव्हाण,विकास लोखंडे,शिवदास गोपाळ,तायडे साहेब,भूषण चौधरी,आदी तपास करत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.