सोयगाव । वार्ताहर
जिल्हा परीषद प्रशाला सोयगांव येथील इयत्ता 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार व वरीष्ठ कार्यालयाच्या सुचनेनुसार शालेय पोषण आहार वाटप करण्यात आले. यामध्ये पुरवठा केलेले तांदूळ, दाळ, तेल यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक आनंदा इंगळे, शालेय व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष संजय मिसाळ, विभाग प्रमुख अनिल ठाकूर, संजय जोहरे, परीचर सुधाकर निबाळकर, प्रविण चावळे, सुनिल शेटे उपस्थित होते.
प्रत्येक जण अगोदर ठरलेल्या व विद्यार्थ्यांना पुर्वकल्पना देऊन ठरलेल्या वेळेनुसार शाळेत उपस्थित होते. कोरोना संर्सगाचा धोका लक्षात घेऊन आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना तोंडाला मास्क किंवा रुमाल आहे की नाही हे तपासून प्रत्येकाच्या हातावर सँनिटायझर लावले जात होते, त्याच बरोबर प्रत्येक विद्यार्थी सोशल डीस्टंसींगनुसार विशिष्ट अंतरावर रांगेने आहे की नाही याचे पालन केले जात होते.याप्रसंगी प्रत्येक विद्यार्थ्यांला शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.
Leave a comment