वैजापुर । वार्ताहर
वैजापूर-श्रीरामपूर हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार यांना 24 ऑगष्ट 2020 रोजी निवेदन देण्यात आले होते. परंतु आज रोजी या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने आज 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता वैजापूर - श्रीरामपूर या रस्त्यावर, गोदावरी नदीच्या पुलावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. हे रास्तारोको आंदोलन 11 ते 1 वाजेपर्यंत सुरू होते.
याठिकाणी बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी भेट देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तसेच रास्ता रोको आंदोलन करणार्यांना आश्वासन दिले. त्यामुळे रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले. जर 21 दिवसात या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही तर 22 व्या दिवशी तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील घंगाळे, तालुकाध्यक्ष सुनिल गायकवाड, पंचक्रोशीतील सर्व सरपंच तसेच शेकडो ग्रामस्थांनी दिला आहे. या आंदोलनात वैजापूर तालुक्यातील लासुरगांव भागातील नागरिक, शिवुर भागातील नागरिक, गोदावरी नदीच्या काठावरील सर्व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
Leave a comment