औरंगाबाद । वार्ताहर

मनपा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय चिकलठाणा औरंगाबाद व साहिल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने पाच सप्टेंबर शिक्षक दिना निमित्ताने देण्यात येणारा यावर्षीचा गुरु गौरव गुणवंत शिक्षक पुरस्कार औरंगाबाद येथील छत्रपती प्राथमिक विद्यालयाचे तंत्रस्नेही शिक्षक रामदास वाघमारे यांना जाहीर झाला आहे.

या पुरस्काराचे वितरण औरंगाबाद येथील मनपा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय चिकलठाणा येथे नामवंत मान्यवरांच्या हस्ते व साहिल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे.गुरुगौरव गुणवंत शिक्षक पुरस्कार रामदास वाघमारे यांना जाहीर झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. औरंगाबाद येथील माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी .बी .चव्हाण, जिल्हा परिषद प्राथमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी श्रीमती अश्विनीताई लाटकर, शहराचे आमदार अतुल सावे ,आमदार सुभाष झांबड ,भाजपा नेते जालिंदर शेंडगे, प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष पाटील प्रशालेच्या मुख्याध्यापिका निर्मला व्यवहारे,संपादक शेखर मगर ,ज्येष्ठ पत्रकार कैलास वाहुळ, संपादक प्रवीण बुरांडे, ज्येष्ठ पत्रकार संजय हिंगोलीकर, संपादक अरुण सुरडकर,पत्रकार संदीप लांडगे, संपादक कल्याण अन्नपूर्ण ,संपादक अनिल कचरे, उपसंपादक दिगंबर शिंदे, डॉ.रत्न चौधरी,मु.अ. संदीप सोनवणे ,इत्यादींनी अभिनंदन केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.