विहामांडव्यात चोरट्यांचा धुमाकूळ; चोरट्यांच्या दहशतीने गावात भिंतीचे वातावरण
विहामांडवा । वार्ताहर
चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घालत कापड दुकान व मेडिकल दुकान फोडुन सुमारे एक लाखाचा ऐवज लंपास केला आहे तर बंद पडलेल्या जिनिग मध्ये आसरा घेतलेल्या मेंढपाळांच्या 25 मेंढ्या चोरी गेल्याची घटना दि.16 ऑगस्ट रोजी पहाटे विहामांडवा येथे उघडकीस आली.यामुळे व्यापारी वर्गात मोठी दहशत निर्माण झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून पाचोड पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या विहामांडवा भागात चोरीचे प्रमाण वाढले आहे. चोरी झालेल्या दुकानांमध्ये एक कापड दुकान आणि मेडिकल दुकान याचा समावेश आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही चोरीची घटना घडली आहे.या प्रकरणी पोलिसांनी यंत्रणा पुढिल तपासणी करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विहामांडवा येथील बाजारपेठेत असलेल्या संजय गाभुड यांची माऊली ड्रेसेस याची दुकान आहे.नेहमीप्रमाणे त्यांनी रात्री दुकान बंद केली.जेव्हा ते जेव्हा दुकान उघडण्यास आले तेव्हा त्यांच्या दुकानांचे लोखंडी शटर उचकटलेले दिसले.त्यांनी आत जाऊन पाहिले असता दुकानातील माल अस्ताव्यस्त अवस्थेत होता.त्यांनी याबाबत विहामांडवा पोलीसांना कळविले.विहामांडवा पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष खरड यांनी घटनास्थळी पाहणी केली असता या दुकानाजवळील नारायण गाभुड यांची मेडिकल दुकानातून अंदाजे नऊ ते दहा हजार रुपये लंपास केले असल्याची माहिती मेडिकल मालकाने त्यांना सांगितले.या दोन दुकानानंतर येथील बंद असलेल्या जिनिंग मध्ये मेंढपाळाने आश्रय घेतला होता,त्या मेंढपाळाची 25 मेंढ्या देखील चोरी गेल्याचे माहिती पोलिसांना दिली. तसेच औरंगाबाद ग्रामीण विशेष तज्ञ पथक घटनास्थळी दाखल होऊन चोरट्यांनी ज्या वस्तु हताळल्या आहे त्या वस्तुचे ठसे घेतले आहे. तसेच पुढिल तपास विहामांडवा पोलिस चौकिचे पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष खरड व औरंगाबाद येथील विशेष तज्ञ पथक करीत आहेत.
Leave a comment