औरंगाबाद । वार्ताहर
लुपिन फाउंडेशन आणि पोलिस कर्मचारी कल्याण निधि या अंतर्गत आज हाय फ्लो नेसल क्यानुला हे आधुनिक उपकरण देणगी स्वरुपात देण्यात आले. ह्या उपकरणाचा उपयोग कोविड आयसीयू मध्ये होतो. क्रिटीकल पेशंट करिता हे मशीन अत्यंत लाभदायक आहे. इथून पुढे डॉ.हेडगेवार रुग्णालयात पोलिस कर्मचार्यांकरिता 8 खाटांची सोय केली जाणार आहे. कोणत्याही पोलिस कर्मचार्याला कोविडची बाधा झाल्यास रुग्णालयात सुविधा उपलब्ध केली जाईल.
पोलिस कमिशनर चिरंजीवी प्रसाद आणि जिमणी मथाई वाईस प्रेसिडेंट लुपिन लिमिटेड यांच्या हस्ते दोन हाय फ्लो नेसल क्यानुला हे मशीन रुग्णालयाला प्रदान करण्यात आले. या प्रसंगी लुपिन फाउंडेशन च्या वतीने जिमणी मथाई उपाध्यक्ष लुपिन लिमिटेड तसेच श्री बाळासाहेब गर्जे सी एस आर प्रमुख औरंगाबाद हे उपस्थित होते. यावेळी पी.एस.आय श्री. घनश्याम सोनवणे तथा इतर पोलिस कर्मचारी उपस्थित होते. डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिलजी भालेराव, कार्यवाह डॉ. अनंत पंढरे सीईओ डॉ. अश्विनीकुमार तुपकरी डॉ. सुहास आजगावकर कार्यवाह सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ, डॉ.व्यंकटेश देशपांडे, डॉ. प्रसन्न पाटील आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
Leave a comment