खुलताबाद । वार्ताहर
खुलताबाद तालुक्यातील झरी-वडगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत काही दिवसांपूर्वी सीमेंट ब्लॉक (गटटु)चे काम हे शासनाच्या नियमानुसार केलेले असुन त्या विरोधात काही विरोधक मंडळीनी एका वर्तमान पत्रात चुकीची बातमी प्रसिद्ध केल्यामुळे येथील सरपंच रूख्मणबाई काळुराम शिरे यांनी वरील कामाविषयी लेखी स्वरूपात तक्रार गट विकास अधिकारी ज्ञानोबा मोकाटे यांच्याकडे केली आहे.
वरील विकासात्मक काम चौदवे वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून अंदाजी रक्क्म 2 लाख पन्नास हजार (2, 50, 000) शासन नियमानुसार खर्च केलेले आहे. या कामाचे एम. बी रेकॉर्ड अडीच लाख रुपयांचे झालेले आहे असे लेखी स्वरुपात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मी माझ्या सरपंच पदाच्या कार्यकाळात सर्व सदस्यांना व उपसरपंच यांना विश्वासात घेऊन काम करण्याचा प्रयत्न करुन झरी-वडगाव ग्रुप ग्रामपंचायतचा विकास करण्याचा पूरापूरा प्रयत्न केला आहे. व माझ्या कार्यकाळात नागरिकांनी विकासात्मक कामाबद्द्ल मासिक मीटिंग / ग्रामसभे मध्ये आतापर्यंत लेखी तक्रार केलेली नसून मी भाजपाचे गंगापुर -खुलताबाद आमदार प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखाली गावाचे विकासात्मक काम केली आहे. व मी एक वयवृद्ध महिला सरपंच असल्याकारणाने मी आतापर्यंत विरोधकाडे लक्ष्य न देता जनतेचे काम केलेले आहे. परंतु एका दैनिकात माझ्या ग्राम पंचायतीच्या कारभाराचे विरोधात बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे मी स्वतः प्रशासनाला लेखी स्वरूपात निवेदन देऊन माझ्या कार्यकाळात झालेल्या विकासात्मक कामांची चौकशी करा असे निवेदन गट विकास अधिकारी पं. स खुलताबाद ज्ञानोबा मोकाटे यांना दिनांक 07/08/2020 रोजी केले आहे. या निवेदनाच्या प्रति जिल्हा परिषद मुख्याधिकारी व उप मुख्याधिकारी, तहसीलदार खुलताबाद, पोलिस निरीक्षक खुलताबाद यांच्याकडे मी विनाभ्रष्टाचार योग्य विकास कामे केली आहे. व मी कुठल्याही चौकशिला तयार आहे. परंतु नाहक बदनामी व त्रास थांबवा अशी मागणी दिलेल्या निवेदनाद्वारे झरी -वडगाव ग्र. पं. सरपंच रुखमनबाई शिरे यांनी केली आहे.
Leave a comment