भराडी । वार्ताहर
जगभरातील पिडीताचे दुःख आपल्या साहित्यातून मांडत अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य क्षेत्रात भारताचा झेंडा जागतिक पातळीवर फडकाविला आहे. याच्या विचार करून शासनाने जन्म शताब्दी महोत्सवानिमित्त भारतरत्न पुरस्कार देऊन अण्णाभाऊचागौरव करावा असे प्रतिपादन प्रा. अनिल साबळे यांनी केले आहे.
विश्वसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे युवा मंच व कै. विष्णुपंत साबळे प्रतिष्टान यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमिताने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विमा प्रतिनधी सुधाकर भोपटकर हे होते या वेळी डॉ. सचिन साबळे, संजय जाधव ,प्रशांत साबळे,सौ. अंजली साबळे, सौ. महेश्वरी साबळे, सौ. स्नेहल साबळे, प्रियंका सोनावणे आदिची उपस्थिती होती.
Leave a comment