पैठण । वार्ताहर
साहित्य रत्न ,थोर समाज सुधारक अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून उपेक्षीतांच्या व्यथा मांडून सामान्य नागरिकांना नायक केले असल्याचं मत पत्रकार नंदकिशोर मगरे यांनी केलं. ते सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या वतीने आयोजित अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम ऑनलाइन झूम एँपच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नितीन ब्रम्हराक्षस ,तर प्रमुख पाहूणे म्हणून संजय पवार ,पंकज गायकवाड ग्राम सेवक संघटणेचे अध्यक्ष वाघ, पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता गंगाधर निसरगंध आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना नंदकिशोर मगरे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी कामगार चळवळीसोबतच स्वातंत्र महाराष्ट्राची चळवळ उभी केली, एका हातात लेखणी घेवून साहित्यातून उपेक्षीतांना न्याय दिला तर दुस-या हातात डफ घेवून शाहीरी व पोवाड्याच्या माध्यमातून प्रबोधन करत जागृती केली .दिड दिवस शाळेत गेलेल्या अण्णा भाऊचां संघर्ष आजच्या उच्च शिक्षीत लोकांना पण समजत नाही एवढी मोठी व्याप्ती त्यांच्या साहित्याची आहे .त्यांचे विचार सामान्य माणसा पर्यंत गेल्यास स्वाभीमानी क्रांती झाल्या शिवाय राहणार नाही असे ही मगरे यांनी सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बार्टीच्या समतादूत जयश्री भिसे प्रकल्प अधिकारी सोनवणे मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे आदींनी यशस्वी प्रयत्न केला.
Leave a comment