आ.प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखाली दूधाची भाववाढ साठी भाजपाकडुन रास्ता रोको आंदोलन
खुलताबाद । वार्ताहर
दूधाची भाववाढ करावी आणि अन्य मागण्यांसाठी शनिवारी (दि.1) ऑगस्ट रोजी भाजपतर्फे राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. या अनुषंगाने खुलताबाद येथे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध केला. हे आंदोलन जिल्हा परिषद औरंगाबादचे उपाध्यक्ष एल.जी गायकवाड, सभापती प. स.खुलताबाद गणेश नाना अधाने, जि.प.माजी सभापती भीमराव खंडागळे,भाजपाचे तालुका अध्यक्ष प्रकाश वाकळे तसेच मित्र पक्षाचे तालुका अध्यक्ष फकीरराव भालेराव, शिवसंग्राम तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर दांडेकर यांच्या उपस्तिथित करण्यात आला.
याप्रसंगी खुलताबाद शहरातील औरंगाबाद-धुळे महामार्गावर दूध उत्पादक शेतकर्यांच्या आंदोलनासाठी भारतीय जनता पार्टी व सहयोगी पक्षांतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .यावेळी दूधाचे घसरत्या दरावरून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात दूध उत्पादक शेतकर्यांच्या मागण्या मांडण्यात आल्या. यावेळी गायीच्या दुधाला सरसकट प्रती लिटर 10 रुपये अनुदान, दूध खरेदीचा दर प्रती लिटर 30 रुपये, दूध भुकटी निर्यातीला प्रती किलो 50 रुपये अनुदान अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. दूध उत्पादक शेतकरी अडचणीत असून .दुधाचे दर खालावले आहे. आणि मात्र या राज्यातील नाकर्त्या राज्य सरकारने दूध उत्पादन शेतकर्यांना वार्यावर सोडून दिले आहे असे आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केले आहे. भाजपातर्फे काही दिवसांपूर्वी दुध उत्पादकांना शासनाने 10 रुपये प्रति लिटर व दुध पावडरला प्रति किलो 50 रु. अनुदान मिळणेबाबत राज्य शासनाकडे मागणी करण्यात आली होती. मात्र, ही मागणी पूर्ण न झाल्याने भाजपातर्फे राज्यव्यापी एल्गार आंदोलन करून निवेदन देण्यात करण्यात आले. निवेदनाचा आशय असा की, गेल्या चार महिन्यापासून कोरोना महामारीमुळे शासनाच्या गोंधळलेल्या भुमिकेमुळे महाराष्ट्रातील जनता अतिशय त्रस्त झाली आहे. आज कोणताही वर्ग मोलमजुर, शेतमजुर, शेतकरी, व्यापारी, हात विक्रेते, व्यावसायिक, कारखानदार शासनाच्या बाबतीत समाधानी नाही. त्यात शेतकर्यांची व दुध उत्पादकांची खूप मोठी थट्टा शासनाकडून होत आहे. दूध उत्पादक शेतकर्यांचा युरिया व रासायनिक खते, वीज बिल,मका खरेदीच्या समस्या सोडवण्यास भाग पाडण्यासाठी आजचे हे एल्गार आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
या प्रसंगी दूध उत्पादक शेतकर्यांच्या गायीच्या दुधाला सरसकट प्रती लिटर 10 रुपये अनुदान द्या, दूध खरेदीचा दर प्रती लिटर 30 रुपये करा दूध भुकटी निर्यातीला प्रती किलो 50 रुपये अनुदान द्या,सद्या दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे.दुधाचे दर खालावले आहे आणि मात्र या राज्यातील नाकर्त्या राज्य सरकारने दूध उत्पादन शेतकर्यांना वार्यावर सोडून दिले आहे.मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आमदार प्रशांत बंब यांनी खुलताबाद येथील जिल्हा परिषद विश्राम गृहात झालेली पत्रकार परिषदेत दिला. यावेळेस भाजपासह इतर मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थीत होते.
Leave a comment