सिल्लोड । वार्ताहर
साहित्यिक ,प्रबोधनकार, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय सेना भवन येथे शिवसेनेच्या वतीने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.
शनिवार (दि.1) रोजी शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर शहरातील सेना भवन येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा राजश्री निकम, शिवसेना तालुकाप्रमुख किशोर अग्रवाल, नगरसेवक सुधाकर पाटील, प्रशांत क्षीरसागर, शेख सलीम हुसेन, शिवसेना तालुका उपप्रमुख रघुनाथ घरमोडे , जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुदर्शन अग्रवाल, रवि गायकवाड, डॉक्टर दत्ता भवर, सखाराम आहीरे ,सुशील गोसावी, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी नारायण फाळके, फहिम पठाण, अबरार देशमुख, अब्दुल बाशीद, भगवान सोनवणे, साहेबराव सोनवणे आदींची उपस्थिती होती.
Leave a comment