विहामांडवा । वार्ताहर
आगामी काळात येणार्या हिंदू तसेच मुस्लिम बांधवांच्या सणांच्या पार्श्वभूमीवर नवगाव येथे शांतता कमिटीची सभा गुरुवारी रोजी सोशल अंतराचे पालन करुन संपन्न झाली.
येत्या काही दिवसांमध्ये गोकुळाष्टमी, बकरी ईद,गणेशोत्सव व मोहरम हे सण साजरे होणार आहेत. हे सण व उत्सव सर्व समाज बांधवांनी मिसळून आनंदाने साजरे करावेत. सण-उत्सवात सर्व समाजातील बंधुभाव व एकोपा वाढीस लागावा असे आवाहन पैठण पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी केले. देशमुख पुढे म्हणाले, यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपल्या व गावाच्या आरोग्याबाबत शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन व कायद्याचे भान ठेउन येणारे सण शांततेत पार पाडा त्याचबरोबर पोलीस व जनता यांनी समन्वयाने काम केल्यास विविध समस्या,तक्रारी व अडीअडचणी सोडविणे सुलभ होते असेही प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
Leave a comment