सोयगाव । वार्ताहर

शालांत प्रमाणपत्र परीक्षा अथवा एस.एस.सी.परीक्षेचा निकाल लागला.जिल्हा परिषद प्रशाला सोयगांव येथील विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील निकालाची परंपरा खंडित न होऊ देता अबाधित चालु ठेवली. काँपीमुक्ती अभियान धोरणाअंतर्गत या वर्षी परीक्षा केद्रावर पुरेपूर पोलीस  बंदोबस्त , पुन्हा पुन्हा केद्रास भेट व विद्यार्थी तपासणी होत होती . एका पेपरला विद्यार्थी येण्याअगोदर पथक उपस्थित होते.ते उत्तरपत्रिका जमा होईपर्यंत पुर्ण परीक्षा केद्रात फिरते होते . विद्यार्थ्यांनी दिलेले ज्ञान व स्व अभ्यासाचा जोरावर विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका लिहली.जिल्हा परीषद प्रशाला सोयगाव शाळेत यावर्षी  मार्च 2020 होणार्‍या एसएससी परीक्षेसाठी 145 विद्यार्थी बसले होते . विषेशप्रविण्यासह  28 विद्यार्थी ,प्रथमश्रेणीत 43 विद्यार्थी , व्दितीयश्रेणीत 32 विद्यार्थी व पासश्रेणीत 06 असे 109 विद्यार्थी उतीर्ण झालेले आहेत . प्रशालेचा शेकडा निकाल 75.17 % इतका आहे.

प्रशालेत हर्षल भगवान ढगे हा विद्यार्थी शेकडा 93.40% गुण घेऊन सर्वप्रथम आला. त्यानंतर व्दितीय कु.आरती किशोर ढगे ही शेकडा 91.20 ,%तृतीय रीया मुकुंद तळेले शेकडा 89.44.%चवथा गौरव शिवाजी चौधरी शेकडा 88.40,% पाचवी कु. हर्षाली संजय मोरे ही मागासवर्गीय विद्यार्थी मधुन प्रथम आलेली आहे तीला शेकडा 88.00.% असे गुण मिळवले . ऊत्तीर्ण विद्यार्थ्यांचे तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विजय दोतोंडे , मुख्याध्यापक आनंदा इंगळे,शिक्षण विस्तार अधिकारी राजीव फुसे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय मिसाळ, पर्यवेक्षक गिरीष जगताप , जयकृष्ण नाईक , सुखदेव पाटील , रवींद्र सुरवाडे , अशोक पवार, दौलतसिंग परदेशी , दादाराव राठोड , पंकज रगडे , अनिल ठाकुर , संजीव जोशी , विद्याधर बागुल , रणजित देशमुख  ,वर्षा रामटेके , वैजीनाथ सावळे , शिवराम आगे , रमेश कोळी , प्रियंका कस्तुरे , सुनील शेटे , प्रविण चावळे , अरुण जगदाळे , निबांळकर यांनी शुभेच्छा दिल्या व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.