मुस्लिम बांधवानी शक्यतो प्रतीकात्मक कुर्बानी करा
पाचोड प्रतिनिधी;-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनेनुसारच बकरी ईद साजरी करावी नमाजही घरीच अदा करावी आणि शक्यतो प्रतीकात्मक कुर्बानी करावी असे आवाहन पाचोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अतुल येरमे यांनी दि.29 रोजी बुधवारी सकाळी घेण्यात आलेल्या शांतता कमिटी बैठक मध्ये करण्यात आले आहे.
येरमे यांनी पुढे बोलताना असे सांगितले कि,शासनाच्या परिपत्रकानुसार राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे शनिवार 1 ऑगस्टला बकरी ईद साजरी करतानाही दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी न करता, आपल्या घरीच अदा करावी करावी. तसेच संपूर्ण नियमाचे व सोशल डिस्टन चे पालन करून ईद साजरी करावी.
तसेच कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार बंद आहे नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अथवा दूरध्वनीवरून खरेदी करावीत.प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईदनिमित्त कोणतीही शिथिलता देता येणार नाही. ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये तसेच उपस्थिती असलेले वरिष्ठ पत्रकार हबीबखान पठाण यांनी बोलताना असे म्हटले की, सध्या कोरोणाच्या महामारी चे संकट देशावरती पडलेली आहे.त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमात किंवा सण असो यामध्ये शासनाने नियम व अटी लागू केलेल्या आहे. त्यामुळे संपूर्ण मुस्लिम बांधवांनी बकरी ईद ही घरी नमाज अदा करून साजरा करावी जेणेकरून प्रशासनाला सहकार्य होईल व कार्यक्रमाला कुठे गालबोट लागणार नाही याची सर्व मुस्लिम बांधवांनी दक्षता घ्यावी. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल येरमे,पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष खरड,पोलिस नाईक भगवान धांडे,पो.काँ.हनुमान धन्वे, पत्रकार संघाचे वरिष्ठ पत्रकार हाबीबखान पठाण,इरफान शेख,मुक्तार शेख,शिवाजी पाचोडे,मुनवर सय्यद,सिराज सय्यद,तसेच कौसर पटेल.सय्यद शाहाद,पाशु मिस्तरी,लतिफ मामु, सय्यद शंमस्भुंदिन, सय्यद दगडू, तांबोली रौफूदिन, कादर कुरेशी, मौलाना हरून ,मौलाना जाकिर अदी मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती.
Leave a comment