सिल्लोड । वार्ताहर
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या सूचनेने तसेच युवा नेते अब्दुल समीर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्यावतीने कोरोना साथ रोगाच्या अनुषंगाने रोगप्रतिकारशक्ती वाढीसाठी कोविड योद्धे तसेच नागरिकांना मालेगाव येथील जोशींदा काढा चे वाटप करण्यात येत आहे.
बुधवार (दि.29) रोजी शहरातील जिल्हा परिषद प्रशालेच्या प्रांगणात नगरपरिषदेतील अधिकारी, कर्मचारी तसेच सफाई कामगारांना जोशीदा काढा चे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख किशोर अग्रवाल, डॉक्टर मच्छिंद्र पाखरे, मुख्याधिकारी सय्यद रफिक, नगरसेवक सुधाकर पाटील, शे. सलीम हुसेन, डॉ. दत्ता भवर, शिवसेना तालुका उपप्रमुख रघुनाथ घरमोडे, रवी रासणे, रुग्ण कल्याण समितीच्या सदस्या दिपाली भवर ,शिवसेना महिला आघाडीच्या मेघा शहा , न.प.तील प्रकल्प समन्वयक देवेंद्र सूर्यवंशी, मोईन पठाण आदींसह न. प. तील कर्मचारी व सफाई कामगारांची उपस्थिती होती.
Leave a comment