खुलताबाद । वार्ताहर

शहरातील किराणा दुकान व इतर दुकाने सकाळी सात ते सात उघडण्याची परवानगी देण्यात यावी,तसेच उर्वरित उद्योग व्यवसाय सुरु करण्यात यावे अश्या विविध मागण्यांचे निवेदन खुलताबाद वासियांचे वतीने तालुका प्रशासनाला अ‍ॅड.कैसरोद्दीन यांच्या वतीने देण्यात आले आहे. खुलताबाद शहरातील दुकानदारांना सकाळी सात ते सात दुकाने उघडण्याची परवानगी द्या, पान दुकान व हॉटेल्स तसेच ऑटो रिक्षा, अ‍ॅपे, काळी पिवळी प्रायव्हेेट जीप चालविण्यासाठी परवानगी देण्यात यावी अश्या विविध मागण्यांचा निवेदन खुलताबाद येथील नागरिकांनी तालुका प्रशासनाला दिला आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की, खुलताबाद शहरात सध्या कोरोनाचे फक्त एक रुग्ण असुन शहरवासी काटकोरपणे पालन करित आहे. म्हणून औरंगाबाद प्रमाणे खुलताबाद येथे सकाळी 7 ते 5 ऐवजी 7 ते 7 (दोन तासांची वाढ) दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावे. तसेच लॉकडाउन लागल्या पासून काळी पिवळी व प्राईव्हेट गाड्या बंद आहे त्यामुळे गाडी चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासोबतच ऑटो रिक्शा चालक, अप्पे आदींची शर्ती आधीन राहून चलविण्याची परवानगी त्यांना देण्यात यावी. या बरोबर शहरातील पान दुकाने, हॉटेल्स चलविण्याचा एक मोठा वर्ग आहे गेल्या चार महिन्यांपासून ते बेरोजगार झाले असुन त्यांचे ही हाल झाले आहे.लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर ज्या प्रमाणे औरंगाबाद शहरात पान दुकाने उघडण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. त्याच प्रमाणे खुलताबादेत ही परवानगी देण्यात यावे, तसेच हॉटेल चालकांना ही आपली दुकाने चालू करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी चालक व मालक करित आहेत. म्हणून मुद्यांचा विचार करुन तातडीने यावर निर्णय घ्यावा जेणेकरून संबंधित लोकांना दिलासा मिळेल.तसेच शहरात इतर धंदे व्यापार सुरु असुन त्यांना ही रोजी रोटी उपलब्ध होईल. दरम्यान या निवेदनाची प्रति जिल्हा अधिकारी औरंगाबाद, उपविभागीय अधिकारी कन्नड-खुलताबाद, पो.उपअ.कन्नड, मुख्याधिकारी न.प.खुलताबाद, तसेच पोलिस निरीक्षक खुलताबाद यांना देण्यात आले असुन खुलताबाद तहसील कार्यालयात सदर निवेदन देण्यात आला. यावेळेस माजी नगराध्यक्ष अ‍ॅड.़कैसरोद्दीन, नगरसेवक मुनीबोद्दीन, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष मुजीबोद्दीन, शर्फोद्दीन रमजानी, माजी उपनगरध्यक्ष मोहम्मद नईम बक्श, नगरसेवक जुबेर लाला, माजी नगरसेवक फकीर मो.कुरैशी, समाजसेवक इसाक कुरैशी, खमरोद्दिन नवाब, मुजीबुर रेहमान आदि उपस्थीत होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.