ना.अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून पहिल्या टप्प्यात 20 हजार नागरिकांना वाटण्यात येणार जोशींदा काढा
सिल्लोड । वार्ताहर
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाअंतर्गत महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या संकल्प व सूचनेनुसार तसेच युवानेते अब्दुल समीर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका शिवसेनेच्या वतीने कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने कोविड योद्धे तसेच नागरिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढीसाठी ’जोशींदा काढा वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.
सोमवार ( दि.27 ) रोजी शहरातील शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस बांधवाना तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांना शिवसेना पदाधिकार्यांच्या हस्ते जोशींदा काढा चे वाटप करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे, निवासी नायब तहसीलदार विनोद करमणकर, पुरवठा नायब तहसीलदार संजय सोनवणे, पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, शिवसेना तालुका प्रमुख किशोर अग्रवाल, नगराध्यक्षा राजश्री निकम, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पाटील गाढे, राजेंद्र ठोंबरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुदर्शन अग्रवाल, शिवसेना तालुका उपप्रमुख रघुनाथ घरमोडे, रवी रासने, संतोष धाडगे, युवासेना शहर प्रमुख शिवा टोम्पे, डॉ. दत्ता भवर, गौरव सहारे, शेख इम्रान ( गुड्डू ) , व्यापारी महासंघाचे सचिव विशाल बावस्कर, सुभाष वडगावकर, रुग्ण कल्याण समितीच्या सदस्या दीपाली भवर, शिवसेना शहर महिला आघाडीच्या मेघा शाह यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस बांधवांची उपस्थिती होती.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे गेल्या महिन्याभरापूर्वी कोरोनाने अक्षरशः थैमान घातले होते. ते मालेगाव आज कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.तेथील नागरिकांनी जोशींना काढाचे सेवन केल्याने त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढली व यामुळे मालेगाव येथील कोरोना आटोक्यात आला असा दावा करण्यात येत आहे. सिल्लोड- सोयगाव मतदारसंघातील नागरिकांचा कोरोना पासून बचाव होण्यासाठी व त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी ना. अब्दुल सत्तार यांनी मालेगावच्या मोहम्मदिया तिब्बीया कॉलेज येथून स्वखर्चाने पहिल्या टप्प्यात मतदार संघातील 20 हजार नागरिकांसाठी जोशींना काढाची ऑर्डर केली होती. या मागणीप्रमाणे मालेगाव येथून जोशिंदा काढाचा पुरवठा होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवार रोजी कोविड योद्धांना सदरील काढा वाटून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. ना. अब्दुल सत्तार यांच्या सुचनेने तसेच युवानेते अब्दुल समीर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर, पोलीस ,महसूल व इतर विभागातील अधिकारी कर्मचारी, पत्रकार आदी कोविड योद्धे यांना तसेच मतदार संघातील ज्या गावात कोरोनाचे रुग्ण आढळले त्या गावात पहिल्या टप्यात प्राधान्याने काढा वाटण्यात येत आहे. सदरील काढा हा मोफत तसेच घरपोच देण्यात येणार आहे. सदरील प्रयोग यशस्वी झाल्यास संपूर्ण मतदार संघात हा काढा वाटण्याचा ना. अब्दुल सत्तार यांचा निर्धार असल्याचे शिवसेना तालुका प्रमुख किशोर अग्रवाल यांनी सांगितले.
Leave a comment