पाचोड कडेठाणः भागातील शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट
पाचोड । विजय चिडे
पैठण तालुक्यात गत आठवड्यात पडलेल्या मुसळधार व अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे.पूर आलेल्या नदीकाठी शेजारील व जवळपास असलेल्या शेतींना सर्वाधिक फटका बसला आहे. वाहत्या नदींचे पाणी घुसल्याने शेतामधील उभे पिके वाहून गेली.तसेच शेतातील माती देखील खरडून पाण्याच्या वाहत्या लोंढ्यासोबत वाहून गेल्याने शेतीची पार वाट लागून गेल्याने शेतकर्यांंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांच्यावर दुबार पेरणीची प्रसंग ओढावल्याने शेतकरी पार संकटात सापडला आहे.दरम्यान महसूल किंवा कृषि विभागाकडून अस्मानी फटका बसलेल्या नुकसानग्रस्त भागातील शेतीची अजूनही पाहणी किंवा पंचनामे करण्यात आलेले नसल्याने शेतकर्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पैठण तालुक्यात गत गुरुवार व शुक्रवारी या दोन दिवसाःत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या,नाले,ओढे बंधारे,तलाव, ओसंडून वाहत आहे. दरम्यान कडेठाण, पाचोड,नांदर,आदी.भागात अतिवृष्टी झाल्याने या भागातील नद्यांना पूर आल्याने नदीकाठी शेजारी लागून असलेल्या असंख्य शेतकर्यांच्या शेतीत नदीचे ओसंडून वाहणाचे पाणी घुसल्याने खरीपातील तूर,कापूस,मूंग,बाजरी,सोयाबीन,
कडेठाण येथे नदीकाठी शेतींना मोठ्या प्रमाणात फाटका बसला असून दोन अडीचशे एकरातील पिके वाहून गेले.तर पाचोड खुर्द येथील गल्हाटी नदी व जवळपासच्या ओढ्यांचे पाणी शेतात शिरल्यामुळे जवळपास पन्नास ते साठ एकर मधील पिके खरडुन गेली. व काही भागात अजूनही शेतात पाणी साचलेले असल्याने त्यामुळे तेथील कपाशी पिवळी पडली आहे.सततच्या अती पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे नाल्यांना पूर आल्याने नाल्याकाठच्या शेतकर्यांना चांगलाचा फटका बसला आहे.त्यामुळे महसूल व कृषी विभागाने तातडीने या नुकसानग्रस्त शेताची पाहणी करून संबंधित शासनाकडून योग्य नुकसान भरपाई मिळवुन द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कुठे शेतात पाणी साचले तर कुठे कपाशी खरंडुन गेली
तालुक्यात मागील आठवड्यात मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने पावसाचा फटका असंख्य शेतकर्यांना सहन करावा लागत आहे.नद्यांना आलेल्या पुरामुळे जवळपास पाचोड आडूळ नांदर भागात जवळपास पाचशे एकरमधील पिकांना फटका बसलेला आहे.काही ठिकाणी तर विहीरी सुध्दा ढासळून गेल्याचे वृत्त आहे.शेतामधील पिकांसोबत माती पण पाण्याच्या प्रवाहत वाहून गेल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतकर्यांवर दुबार पेरण्यांचे संकट
या वर्षी अगदी जूनच्या आरंभापासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने खरीपाची पेरणी लवकर आटोपली होती, परिणामी पिके जोमात आहेत. परंतु या सगळ्या आनंदावर विरझण पसरेल कि काय असे चित्र निर्माण झाले आहे. काही पिके पावसाच्या पाण्याने उन्मळून गेली आहेत. त्यामुळे खरीप पिके वाया जाण्याची शक्यता आहे. ओढे, नाल्यांचेही पाणी उभ्या पिकांमध्ये घुसले असल्याने पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे पिके सडण्याची चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत. चोहोबाजुंनी शेतकरी कोंडीत सापडला आहे. महागडी बियाणांची खरेदी करून पेरणी केली आहे. तसेच महागडी खते वापरली गेली आहेत यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे.
Leave a comment