बोरगांव बाजार । वार्ताहर
सिल्लोड तालुक्यातील अजिंठा अंधारी मध्यम प्रकल्प पाणलोट क्षेञात मागील आठवड्यापासुन दमदार पाऊस होत आसल्यामुळे अजिंठा अंधारी प्रकल्पात आजरोजी 80 टक्के पाणीसाठा झाला आहे,धरण पाणलोटक्षेञ परिसरात पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाल्यास धरण कधीही ओव्हरफ्लो होऊ शकते.
अंधारी प्रकल्पात गेल्या काही दिवसात 30 टक्के पाणीसाठा होता. मागील पंधरा दिवसापूर्वी यात वाढ होऊन धरणात 5 टक्के पाणीसाठा झाला होता, यानतंर गुरुवारी सायंकाळी तीन तास पाऊसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे धरण पाणी साठ्यात मोठी वाढ होऊन ती 80 टक्क्यावर गेली आहे. सद्यास्थितीत धरणात एकूण पाणीसाठा 6.30 टक्के असून धरणाची क्षमता 7.65 द.ल.घ.मी. आहे,गेल्या पंधरा दिवसापासून धरणपाणलोट क्षेञ परिसरात रिमझिम तर कधी जोरदार पाऊस सुरू आहे,सध्या पाण्याची पातळी 572.20 सेमी एवढी आहे.तर उपयुक्त जलसाठा 6.175 दशलक्ष धन मीटर इतका आहे,गुरुवारी सायंकाळी धरण पाणलोट क्षेञ परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, सद्यस्थिती अंधारी मध्यम प्रकल्पात 80 टक्के पाणीसाठा आहे,व ओव्हरफ्लो होण्यास 20 टक्के बाकी आहे,असा एखादा जोरदार पाऊस पडला तर धरण कधीही ओव्हरफ्लो होऊ शकते,अशी माहिती सिल्लोड शाखा कनिष्ठ अभियंता रोशन महाजन यांनी दिली.
Leave a comment