औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद चिकलठाणा येथील श्री बबनराव ढाकणे विद्यालयातील शिक्षक दादाजी माळी, गणेश राजमाने,संतोष फुंदे व विलास काळे यांनी लॉकडाऊनच्या काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नवजीवन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था शिवना ता.सिल्लोड जि.औरंगाबाद संस्थेच्या वतीनेे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजिंठा पोलीस स्टेशन श्री.किरण आहेर, डॉक्टर पांडुरंग चौधरी वैद्यकीय अधिकारी शिवना,संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुभाषचंद्र काळे, सचिव डॉ.अविनाश काळे व नंदकुमार गोसावी यांच्या शुभ हस्ते कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या वेळी गणेश राजमाने म्हणाले की कोविड 19 कोरोना विषाणुशी लढण्या करीता सर्वांनी आपापल्या माध्यमातून योगदान दिले आहे.श्री बबनराव ढाकणे विद्यालयाच्या शिक्षकांनाही सामाजिक बांधिलकी जोपासून एक शिक्षक व समाजसेवक म्हणून सर्व शिक्षक बंधूंनी आपली जबाबदारी पार पाडली आहे.यावेळी खर्या अर्थाने हा सन्मान श्री.बबनराव ढाकणे विद्यालय व महाविद्यालयाचा असून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.विनायकराव पा.वाघ साहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आलेली आहेत.खर्या अर्थाने ते आमचे प्रेरणास्थान होते. यापुढे ही त्यांचा शैक्षणिक, सामाजिक कार्याचा वारसा आम्ही सक्षम पुढे राबवत राहू असे गणेश राजमाने म्हणाले. प्राचार्या मिना कालेवार, कार्यकारी विश्वस्त संदिप वाघ, राजीव वाघ, संजीव वाघ, भारत चाटे, प्रा.नवनाथ शिरसाट, अशोक कांगणे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
Leave a comment