पहिल्याच श्रावण सोमवारी भाविकांची दर्शनासाठी धाव
फर्दापूर । वार्ताहर
मराठवाडा-खान्देशच्या सीमेवर वसलेल्या श्रीक्षेत्र चौंडेश्वर येथे पहील्याच श्रावण सोमवारी भाविकांची मांदियाळी बघावयास मिळाली कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवसापासून तिर्थस्थळे व पर्यटनस्थळांन कडे नागरिकांनी पाठ फिरवली असल्याचे दिसून येत असतांना फर्दापूर (ता.सोयगाव) येथील वाघूर नदीच्या संगमावर वसलेल्या श्रीक्षेत्र चौंडेश्वर येथे भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती नोंदविल्याचे दिसून आले आहे.फर्दापूर जवळील मराठवाडा व खान्देश च्या सीमेवरील वाघूर नदीच्या संगमावर श्रीक्षेत्र चौंडेश्वर विराजित आहे औरंगाबाद-जळगाव जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात या तिर्थस्थळाची मोठी ख्याती असून दरवर्षी श्रावण महिन्यात येथे भाविकांचा मोठा जनसागर उसळत असतो त्र्यंबकेश्वर नाशिक येथे करण्यात येणारे नारायण नागबळी,कालसर्प शांती या सारखे अनेक विधी श्रीक्षेत्र चौंडेश्वर येथे पार पाडता येत असल्याने दरवर्षी श्रावण सोमवारी या तिर्थस्थळी दाळ बट्टीच्या जेवणावळी देवून आपले नवस फेडण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांचा जनसागर उसळतांना दिसत असतो दरम्यान या वर्षी कोरोनाची धास्ती असतांना ही दि.27 रोजी पहील्याच श्रावण सोमवारी दरवर्षी च्या तुलनेत कमी असलीतरी बर्यापैकी भाविकांची मांदियाळी श्रीक्षेत्र चौंडेश्वर येथे बघायवयास मिळाली देव दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी दर्शना सोबतच खळखळणार्या वाघूर नदीच्या पात्रात मनसोक्त पोहण्याचा आनंद ही लुटल्याचे दिसून आले आहे.
Leave a comment