औरंगाबाद :
औरंगाबाद जिल्ह्यात आज 406 जणांना (मनपा 265, ग्रामीण 141) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 8159 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 237 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12908 झाली आहे. आजपर्यंत एकूण 437 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4312 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दुपारनंतर 197 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 11, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 73 आणि ग्रामीण भागात 76 आढळलेले आहेत. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
*ग्रामीण भागातील रुग्ण 88
सोनार गल्ली, गंगापूर (1), बजाज नगर, वाळूज (2), देवगाव रंगारी (2), नवगाव, पैठण (1), इंगळे वस्ती, वैजापूर (1), अन्य (1), रांजणगाव (1), महालक्ष्मी खेडा, गंगापूर (1), माऊली नगर, गंगापूर (1), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (1), औरंगाबाद (19), फुलंब्री (4), गंगापूर (17), वैजापूर (26), पैठण (10)
सिटी एंट्री पॉइंटवरील रुग्ण (11)
होनाजी नगर (1), आडूळ (2), बाळापूर (1), अंबिका नगर (1), वैजापूर (2), वाळूज महानगर (1), कमलापूर (1), पोलिस वसाहत (2)
*मनपा हद्दीतील रुग्ण (25)*
टीव्ही सेंटर, पोलिस कॉलनी (1), मिल कॉर्नर, पोलिस कॉलनी (1), मित्र नगर (1), राजीव गांधी नगर (2), सातारा परिसर (1), गारखेडा (1), गजानन कॉलनी (1), सिंधी कॉलनी, क्रांती चौक (1), एन आठ (1), एन बारा (1), रघुनाथ नगर (1), अन्य (3), गणेश कॉलनी (1), जाधववाडी (1), गंगापूर (1), साई संकुल, नक्षत्रवाडी (1), बीड बायपास (1)
गुलमंडी (1), छाया नगर, एन नऊ सिडको (1), न्यू हनुमान नगर, गारखेडा (1), चौधरी कॉलनी, चिकलठाणा (1), मनजित नगर (1)
*पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू*
घाटीत कृष्णा नगरातील 50, मुकुंदवाडीच्या संघर्ष नगरातील 88 आणि जालान नगरातील 75 वर्षीय पुरूष, कन्नड तालुक्यातील चापानेरमधील 60 वर्षीय स्त्री, वैजापूरमधील दाहेगावातील 55 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Leave a comment