बोरगांव बाजार । वार्ताहर
बोरगाव बाजार व परीसरात यावर्षी नागपंचमीचा सण घरगुती पुजनपाठ करुन साजरा करण्यात आला. श्रावण महीन्याचा पहीला सण म्हणुन नागपंचमीचा सणा असाधारण महत्व आहे, व यानिमीत्त लेकुरवाळी व सुवासिनी मोठ्या उत्साहने गाणे गाऊन झोके खेळतात, व नतंर नाग देवता पावन करण्यासाठी वारुळाचे पुजन करण्यात येते व दरवर्षी यासणा खुप गर्दी असते परंतु यावर्षीकोरोनाच्या ससंर्गामुळे नागपंचमी च्या सणावर सुद्धा कोरोनाचा परिणाम दिसुन आला, यामुळे वर्षी नागपंचमीला घरीच मातीचे वारूळ बनवून पुजा पाठ करून साजरा करण्यात आला, यावर्षी नागदेवता पुजन करण्यासाठी एखाद ,दोन महीला मोठ्या मुश्किलीने घराबाहेर दिसुन आल्या होत्या,व मंदिराच्या गेटला कूलुप आसल्यामुळे बाहेरून पुजन करावे लागले.
Leave a comment