खुलताबाद । वार्ताहर
खुलताबाद येथील सामाजिक कार्यकर्ते बाबा पटेल यांनी खुलताबाद तहसील कार्यालयतील पेशकार यांच्या विरुद्घ तहसीलदारांना एका निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. या निवेदनात असे नमूद केले आहे की, पेशकार बोर्डे यांनी आरेरावी भाषा वापरत मला कार्यालया बाहेर हाकलून लावले. व मला म्हणाले की, तुम्ही मुस्लिम लोक कार्यलयात येऊ नये. तुम्ही मुस्लिम लोकांमुडे आम्ही लोकांना कोरोना होत आहे.
मी भडजी येथील काही मुस्लिम बांधव व मी स्वतः कब्रस्तानचे कामासाठी तहसील कार्यालयात गेले असता तहसीलदार म्हणाले होते की, मला स्वतः तहसीलमध्ये येऊन भेटा. सांगितल्या प्रमाणे आम्ही चार पाच लोक तहसीलदार यांना भेटायला गेलो असता त्यांनी पेशकार बोर्डे यांनी शाब्दिक बाताबाची करुन आम्हाला कार्यालयातुन हकलून लावले. अशा बेशिस्त अधिकार्यांवर पोलिसात गुन्हा दाखल अन्यथा आम्ही संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल.अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते बाबा पटेल यांनी दिली. यावेळेस नितिन जाधव, फकीरराव भालेराव, वसंतराव शिरसाट गल्लेबोरगावकर राजाराम घुसळे, विष्णु घुसळे उपस्थीत होते.
Leave a comment