बोरगांव बाजार । वार्ताहर

सिल्लोड तालुक्यातील सावखेडा व  परिसरात गुरूवारी दुपारी  3.00 वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वार्‍यासह पाऊसाने हजेरी लावल्यामुळे  शेकडो  हेक्टर मका पिक भुईसपाट,अनेक शेताना आले तलावाचे स्वरुप.

सावखेडा,बोरगाव बाजार, बोरगांव सारवाणी, खातखेडा, दिडगांव,डोईफोडा,भराडी,देऊळगांव बाजार, तळणी, कासोद, सह परिसरात दिनांक 23 वार गुरूवार रोजी दुपारी 3.00 वाजे दरम्यान अचानक वादळी वार्‍यासह पाऊसाने हजेरी लावली व एक ते दिड तास चाललेल्या सोसाट्याच्या वार्‍यांसह पाऊसाने काही तासात शेतकर्‍यांच्या पिकांच होत्याच नव्हत करुन टाकल,या वादळीवार्‍यांने सावखेडा ता.सिल्लोड येथील गट क्रं.288 मधील शेतकरी बाळासाहेब गोंगेसह अनेक शेतकर्‍यांचे चांगले बहारत आलेले मका पिक पुर्ण जमिनदोस्त झाले आहे, व त्यांच्या शेताला तलावाचे स्वरुप आले आहे, याच बरोबर परिसरात इतर शेतकर्‍यांचे सुध्दा कपाशी,सोयाबिन, मकाचे,बाजरी,कडधान्यसह इतर पिक यावर्षी पाणी पाऊस व खते-औषधी वेळेवर आसल्यामुळे कबंर-छाती बरोबर झाले होते,व गुरूवारी सोसाट्याचा वारा व पाऊसा समोर मकाची झाडे मधोमध तुडले आहे, यामुळे पाऊसाची भयानकता किती मोठी होती हे यावरुन दिसुन येते,व या वार्‍यामुळे आडव्या पडलेल्या मकाला पडल्यामुळे दाणे (कणीस) लागणे मुश्कील आसल्यामुळे शेतकर्‍यांपुढे हे नवीन संकट उभे ठाकले आहे,यामुळे हे आडवी पडलेली मका धड चारा,नाधड माल या अशा परिस्थिती हे पिक नष्ट करुन त्याजागी कोणते पिक पेरावे यामुळे शेतकर्‍यांच्या आर्थिक अडचणीत आणखी भर पडल्याचे चिञ सावखेडा परिसरात दिसुन आले आहे, तरी संबधीत महसुल व पंचायत विभागाने लवकरात लवकर नुकसाग्रस्त शेतकर्‍यांच्या नुकसान ग्रस्त पिकाची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांतुन होत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.