सोयगाव । वार्ताहर
सोयगावसह परिसरात झालेल्या बुधवारच्या पावसाची अतिवृष्टी झाल्याची नोंद महसूल विभागाने केली असून या अतिवृष्टीत सोयगाव शिवारातील फुलपात्यांवर आलेल्या खरिपाच्या हंगामावर पुनः संकट कोसळले आहे.सोयगाव शिवारात काही भागात नाल्यांच्या आलेल्या पुरात शेतीसह खरीपाचे पिके वाहून गेली आहे.त्यामुळे सोयगाव शिवारात फुलपात्यांवर आलेल्या पिकांना पुनः अतिवृष्टीचा धक्का बसला आहे.
गेल्या पाच दिवसापासून सोयगाव तालुक्यात पावसाचा खंड पडलेला असतांना बुधवारी दुपारी अचानक झालेल्या पावसाने सोयगाव मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.यामध्ये शहरातील प्रमुख भागात पुराचे पाणी स्जीराल्याने गोंधळ उडाला होता.या अतिवृष्टीच्या पावसात मात्र सोयगाव शिवारातील 110 एकरवरील खारीपाच्या पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक अहवाल तालुका कृषी विभागाने दिला असून या नुकसानीचे पंचनामे होईल किंवा नाही याबाबत शेतकर्यांना प्रश्नचिन्हे निर्माण झाले आहे,परंतु संसर्गाच्या सोयगावसह उर्वरित मंडळात तब्बल जून महिन्यापासून तीनवेळा अतिवृष्टीची नोंद विविध मंडळात नोंदविल्या गेलेली असतांना मात्र पंचनामे झालेले नाही केवळ पंचनामे तर दूरच परंतु अद्यापही या तीन वेळा झालेल्या मंडळातील नुकसानीची पाहणीही करण्यात आलेली नसल्याचे शेतकर्यांनी डोळ्यादेखत पहिले आहे.सोयगाव मंडळात या पाब्साल्यात तब्बल तीनवेळा अतिवृष्टीची नोंद करण्यात आली होती पहिल्यांदा खरीपाची कोवळी अंकुर असतांना अतिवृष्टी झाली होती त्यावेळच्या पावसात सोयगावला सहा जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली होती.त्या जनावरांच्या नुकसानीचीघी अद्याप मदत पशुपालकांच्या पदरात पडलेली नसून बुधवारच्या अतिवृष्टीचा प्रश्न तर दूरच राहिला आहे.घोसला ता.सोयगाव गावातही आठवडाभरापूर्वी झालेल्या पावसात नाल्याला आलेल्या पुरात तब्बल 50 शेतकर्यांचे उभे पिके वाहून गेलेली आहे.या नुकसानीची पाहणी कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी केली आहे.
Leave a comment