जरंडी कोविड केंद्रातून रुग्णांना गुलाब पुष्प देवून स्वागत
सोयगाव । वार्ताहर
सोयगाव तालुक्यात कोरोनाची गुरुवारी सहा रुग्णांची जरंडीच्या कोविड केंद्रातून प्रकृती स्थिर झाल्याने घरी पाठविण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रवीण पांडे यांनी दिली. जरंडी ता.सोयगाव येथील कोविड केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या त्या दहा रुग्णांपैकी सहा जण कोरोनातून बाहेर निघाल्याने कोरोनामुक्त झालेल्या सहा रुग्णांना गुरुवारी प्रशासनाच्या वतीने गुलाबपुष्प देवून सत्कार करून घरी पाठविण्यात आले,यावेळी तहसीलदार प्रवीण पांडे यांच्या हस्ते त्या सहा रुग्णांवर इमारतीच्या खाली येताच त्यांचेवर फुलांचा वर्षाव केला व त्यांचे मनोबल उंचावण्यात आले.
जरंडीच्या कोविड केंद्रात दहा रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, त्या सहा रुग्णांना प्रकृती स्थिर असल्याने गुरुवारी कोरोनामधून बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले,यावेळी आरोग्य,महसूल,आणि पंचायत समितीच्या वतीने या सहा रुग्णांचे फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे यांनी पुन्हा त्यांच्या तपासण्या घेवून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे जाहीर करून त्यांची सुटी करण्यात आली,यावेळी उपविभागीय अधिकारी संजीव मोरे,तहसीलदार प्रवीण पांडे,गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे,तालुका अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे,ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे आदींसह आरोग्य कर्मचार्यांची उपस्थिती होती.
Leave a comment