भराडी । वार्ताहर
सिल्लोड तालुक्यातील भराड़ी येथे कोरोना बाधीत रूग्ण आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे,त्यामुळे तो परिसर सिल करण्यात आला. सिल्लोड तालुक्यातील भराड़ी येथिल दोघांना कोविडचे लक्षणे दिसून येत असल्याने त्यांना औरंगाबाद येथे दिनांक 21/7/20 रोजी नेन्यात आले होते.त्या दोघातुन एकाचे रिपोट अजुन आलेले नाही परंतु एक 58 वर्षीय कोरोना बाधीत रुग्ण आढळुन आल्यामुळे संपुर्ण परिसरात खळबळ उडाली आहे व ज्या परिसरात रुग्ण आढळून आलेला आहे अशी माहिती येथील आरोग्य सेविका शारदा दरबस्तवार यांनी दिली.
त्यामुळे परिसर सिल करण्यात आला आहे,यानतंर पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या घरातील तीन व्यक्तिन्ना घरातच थांबण्याचे आरोग्य सेविका शारदा दरबस्तवार,किरण चरावंडे,बिट जमादार विठठल चव्हाण,ग्राम विकास अधिकारी अशोक दौड़,पोलिस पाटिल यमुनाबाई,पंचायत समितीचे काकासाहेब राकडे,ग्रा.सं सदस्य यांनी त्या घरातील तिघान्ना गहरा बाहेर येऊ नये किंवा कोनाशी संपर्क होउ नये या साठी घरातच राहण्याचे सांगितले आहे. या रुग्नावर औरंगाबाद येथील एम.जी.एम रुग्णालयात उपचार सुरु आहे. कोरोना ससंर्गाच्या पाश्वभुमीवर शासन व प्रशासकिय यंञणेकडून लाखो रूपयाचा खर्च करून शहर व ग्रामिण भागात जोरदार उपाय योजना राबविल्या जात असतानाही कोरोना बांधीताचा वाढता आकडा हा नागरीकाच्या वतीने करण्यात येणार्या निष्काळजीपणा, (सोशल डिस्टन्सिग)सामाजिक अतंर न पाळने यामुळे होत आहे.त्यामुळे सोशल डिस्टन्सिगचा फज्जा उडत असल्याचे दिसुन येत आहे,आता कोरोना मुक्त गाव व परिसर करण्यासाठी नागरीकानी स्वतःहुन शासनाने दिलेले निर्देशाचे पाळणे करने गरजेचे झाले आहे.
Leave a comment