खुलताबाद । वार्ताहर
गंगापुर-खुलताबाद मतदार संघातील तथा जिल्ह्यातील मका व इतर पिकांचे पावसामुळे नुकसान झाल्याने सदरील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन शासनास अहवाल सादर करावा. तसेच नुकसान ग्रस्त शेतकर्यांना दुबार पेरणी साठी मोफत बियाणे व खते उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी गंगापुर खुलताबाद चे आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हा अधिकार्यांना निवेदन देऊन केली आहे. एकीकडे कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. तर दूसरीकडे एकामागून एक येणार्या संकटांमुळे शेतकरी बांधव हवालदिल झालेले असुन अशा संकटाच्या वेळी शेतकरी बांधवांच्या मागे खंबीरपणे उभे राहणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.
जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी भविष्यात देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दुवा असणार आहे. कारण शेतकरी बांधव फक्त स्वतः साठी न जगता दशासाठी प्रचंड परिश्रम करुन अन्नधान्ये पिकवुन आपण सर्वांची भूक भागवित असतो. तसेच जगातील अनेक देशांना अन्नधान्यांचा पुरवठा आपला देश करतो. हे केवळ शेतकरी बांधवांमुळेच. म्हणून पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच दुबार पेरणीसाठी बियाणे व खते मोफत वितरित करुन शासनास अहवाल सादर करवा. या निवेदनाची प्रति मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, प्रधान सचिव कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, तसेच तहसीलदार गंगापुर, व तहसीलदार खुलताबाद यांना देण्यात आली असुन खुलताबाद येथील तहसीलदारांना हे निवेदन सभापती पंचायत समिती खुलताबाद गणेश अधाने, माजी उपसभापती दिनेश अंभोरे, नगरसेवक योगेश बारगळ, परसराम बारगळ यांची उपस्तिथित देण्यात आले.
Leave a comment