औरंगाबाद । वार्ताहर

भारतातील व्यावसायिक वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या व हिंदुजा उद्योगसमुहातील दिग्गज अशा अशोक लेलँड कंपनीने आपल्या एव्हीटीआर’ या मॉड्युलर ट्रक श्रेणी’तील, आय-जेन6 बीएस-6’ तंत्रज्ञानाने युक्त, अशा 1350 हून अधिक वाहनांचे वितरण देशभरात केले आहे. आज औरंगाबादमध्ये एव्हीटीआर’ सादर करण्यात आला व येथील ग्राहकांना त्याचे वितरण करण्यात आले. पगारिया मोटर्स यांच्या वतीने हा वितरण सोहळा पार पडला. या प्रसंगी अशोक लेलँड’चे सीओओ अनुज कठुरिया, तसेच पगारिया मोटर्स’चे राहुल पगारिया हे उपस्थित होते. यावेळी एव्हीटीआर’चे वितरण ग्राहकांना व्हर्च्युअल पद्धतीने झाले. अशोक लेलँड’चे सीओओ अनुज कठुरिया यावेळी म्हणाले, ’आमच्या एव्हीटीआर ट्रक्समधून ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान व नाविन्य मिळते. आपली अर्थव्यवस्था आता सुरळीत होऊ लागली असून व्यवहारदेखील सामान्य स्तरावर होऊ लागले आहेत. अशा वेळी हे नवीन ट्रक मालवाहतुकीमध्ये मोलाची भूमिका बजावतील. सध्या पैसे वाचविण्यास मोठेच महत्त्व आले असल्याने, ट्रकची गुणवत्ता व त्याच्या देखरेखीचा कमी खर्च या दृष्टीने या ट्रकच्या मालकीहक्काचे एकूण मूल्य हे मापदंड ठरले आहे. विजयवाडा येथील एएमपीएल या आमच्या विश्वासू भागीदारामुळे व्यवसायवाढीचे उद्दिष्ट ठेवणार्‍या आमच्या ग्राहकांची संख्या वाढण्यास मदत होत आहे.’’

‘पगारिया मोटर्स’चे राहुल पगारिया यावेळी म्हणाले, अशोक लेलँड हा ब्रँड मजबूती आणि विश्वासार्हता यांसाठी ओळखला जातो. नवीन एव्हीटीआर श्रेणी सादर करून कंपनीने आपल्या वाहनांमध्ये एका नवीन मापदंड घालून दिला आहे. आपल्या विशिष्ट गरजांकरीता हवे तसे मॉडेल मिळण्यासाठी ग्राहकाला यामध्ये अनेकविध पर्याय उपलब्ध आहेत. याचबरोबर अत्याधुनिक आय-जेन6’ तंत्रज्ञानामुळे एव्हीटीआर ट्रक खरेदीदारांसाठी प्राधान्याची निवड बनते. जास्तीत जास्त ग्राहकांच्या व्यावसायिक गरजा भागवण्याकरीता या ट्रकमध्ये गुंतवणूकीचे मूल्य उपलब्ध आहे, याची आम्ही खात्री देऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांना आपला व्यवसाय व नफा वाढविण्यात मदत होईल.

अशोक लेलँड’च्या एव्हीटीआर ट्रकला डिझाईनचे सात पेटंट मिळाले आहेत. एका मॉड्युलर प्लॅटफॉर्मवर बांधण्यात आलेल्या या ट्रकमध्ये आय-जेन6’ हे कार्यक्षम इंजिन आहे. भारतातील व्यावसायिक वाहनांमध्ये असे इंजिन प्रथमच बसविण्यात आले आहे. अ‍ॅक्सल कॉन्फिग्युरेशन, लोडिंग स्पॅन, केबिन्स, सस्पेन्शन्स व ड्राईव्हट्रेन्स यांचे विविध पर्याय या एका सिंगल प्लॅटफॉर्मवर, 18.5 टन ते 55 टन एवढ्या मोठ्या पल्ल्यासाठी, या व्यावसायिक जड वाहनामध्ये देण्यात आले आहेत. यामुळे ग्राहकांना त्यांच्या व्यवसायातील गरजेनुसार आणि हव्या त्या विनियोगाप्रमाणे ट्रकची निवड करता येईल.

‘एव्हीटीआर प्लॅटफॉर्म’ मुळे ग्राहकांना त्यांच्या गरजांना अनुरुप असे कॉम्बिनेशन असलेल्या मॉडेलची निवड करता येते. त्यायोगे त्यांना व्यावसायिक काटकसर आणि उत्कृष्टतेचे समाधान या दोन्ही गोष्टी साधता येतील. कंपनीच्या दृष्टीने याचा अर्थ, कोणत्याही स्वरुपाच्या ग्राहकासाठी व बाजारपेठेत अधिक हिस्सा मिळवण्यासाठी कोट्यवधी कॉम्बिनेशन्स सादर करून आपली व्याप्ती वाढवणे हा होय. वाहनचालकाला अधिक सुरक्षितता आणि उत्तम आराम, उच्च विश्वसनीयता आणि वर्धित टिकाऊपणा या गोष्टी या मॉड्यूलर प्लॅटफॉर्ममधून मिळतात. अतिप्रगत अशा आय-अलर्ट फ्लीट मॅनेजमेंट सिस्टीम’ची आणि त्यातील रिमोट डायग्नोस्टिक्स’ या सुविधेचीही मदत चालकाला मिळते. देशभरात अशोक लेलँड’ची एक हजाराहून अधिक सेवा केंद्रे ग्राहकांना कार्यक्षम सेवा देण्यासाठी उपलब्ध आहेत. अशोक लेलँड’ची उत्पादने व सेवा यांबाबत कोणत्याही चौकशीसाठी ग्राहक 18002663340 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.