शासनाला दूध भेट देऊन दिले निवेदन; 1 ऑगस्टला दिला दूध एल्गार आंदोलनाचा दिला इशारा

भराड़ी । वार्ताहर

भारतीय जनता पार्टी-रिपाई(अ)-रासप-शिवसंग्राम-रयत क्रांती महायुतीच्या सिल्लोड तालुका महायुतीच्या सर्व प्रमुख पदाधिकारी माजी आमदार  सांडू पाटील लोखंडे, भाजपा प्रदेश चिटणीस इद्रीस मुलतानी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर, किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस मकरंद कोर्डे, दुध संघाचे संचालक राजेंद्र जैस्वाल, माजी चेअरमन श्रीरंग साळवे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष सुनील मिरकर, माजी सभापती अशोक गरुड किसान मोर्चा तालुकाध्यक्ष पुंजाराम गरुड, जिल्हा सरचिटणीस संजय डमाळे, भाजयुमो तालुकाध्यक्ष किशोर गवळे, रयत क्रांतीचे समाधान फुले, नारायण बडक यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांना शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नी मागण्याचे निवेदन देऊन शासनाला दूध भेट दिले.

निवेदनातील मागण्या पुढीलप्रमाणे गायीच्या दुधाला सरसकट 10 रु./- लिटर अनुदान व दुध पावडरला प्रती किलो 50 रु. अनुदानाच्या मागणी करिता 1 ऑगस्ट 2020 रोजीच्या राज्यव्यापी दुध संकलन बंद आंदोलनाबाबत निवेदन सादर महाराष्ट्रामधील शेतकर्‍यांच्या संकटामध्ये दिवसेदिवस भर पडत आहे. बँकेकडून नाकारल्या जाणारा कर्ज पुरवठा, नकली सोयाबीन बियाणामुळे करावी लागलेली दुबार पेरणी, युरिया खताचा तुटवडा व काळा बाजार, कोकणातील शेतकर्‍यांचे वादळामुळे झालेले नुकसान, अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकाचे झालेले नुकसान या विविध संकटामध्ये शासनाकडून शेतकर्‍यांना कोणताही दिलासा प्राप्त झाला नाही. या संकटाच्या माळेमध्ये दुधाचे भाव कमी झाल्याने दुध उत्पादक शेतकर्‍यांची अवस्था दयनीय झाली आहे.

महाराष्ट्रामध्ये 150 लाख लिटर गायीचे दुध उत्पादित होते. त्यापैकी 30 लाख लिटर सहकारी संघाकडून खरेदी केल्या जाते. 90 लाख लिटर दुध खाजगीसंस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतल्या जाते. 30 लाख लिटर दुध शेतकरी स्वत: हॉटेल्स, ग्राहक यांना पुरवितो. शासकीय योजनेद्वारे फक्त 1 लाख लिटर दुध खरेदी केले जाते. या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात दुधाचा विक्रीमध्ये 30 टक्केपर्यंत घट झाली. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली. आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दुध संघाकडून दुध 20 ते 22 रु. दराने खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही. शासनाने 10 लाख लिटर दुध 25 रु. प्रती लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात 7 लाख लिटर दुध खरेदी केल्या जात आहे. मंत्र्याचे लागेबांधे असलेल्या दुध संघाकडून शासन दुध विकत घेत आहे. इतर शेतकर्‍यांना व दुध उत्पादकांना शासनाने वार्‍यावर सोडले आहे. गायीच्या दुधाला प्रती लिटर 10 रु. अनुदान, दुध भुकटी करिता प्रती किलो 50 रु अनुदान, शासनाकडून 30 रु. प्रती लिटरने दुधाची खरेदी या न्याय्य मागण्याकरिता आम्ही सर्व शेतकरी बांधव 1 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दुध संकलन बंद आंदोलन करीत आहोत. या निवेद्नासोबातच गायीचे पवित्र दुध आपणास व आपल्या मंत्री मंडळातील सर्व सहकार्‍याकरिता पाठवीत आहो. या पवित्र दुधाचे प्राशन करून आपण न्याय बुद्धीने वरील सर्व मागण्या मान्य कराल एवढीच अपेक्षा असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी मधुकर फुके, आण्णा जीवरग, नीलकंठ जैवळ, कचरू फरकाडे, नामदेव मगर, जगन्नाथ जाधव, पंडित श्रीखंडे, संतोष भवर, विलास फरकाडे, सोमिनाथ कळम आदी दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.