औरंगाबाद । वार्ताहर
कोविड 19 कोरोना विषाणू मुळे गेल्या चार महिण्या पासून लॉकडाऊन सुरू होतं हातावर पोट असणार्यास अनेक समाज बांधवांचे कामधंदे बंद पडले असून अनेकांच्या नोकर्या गेल्या आहेत या संकटातून सावरण्यासाठी सामाजीक बांधिलकी म्हणून तेली समाजातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना तेली सेना, तेली समाजाच्या वतीने शालेय साहित्य देऊन मदत करण्यात येणार आहे.
ज्या समाज बांधवांना विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन मदत करण्याची इच्छा आहे. त्यांनी व ज्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांची गरज आहे.अशांनी संपर्क साधावा तसेच यंदा दहावी बारावी 75./.च्या पुढील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी मार्क मेमो व पासपोर्ट फोटो ई-मेल किंवा व्हाटसअप करावा,तेली समाजातील मान्यवरांशी विचार विनिमय करून योग्य तारीख ठरवून सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे.रोख पैसे स्विकारल्या जाणार नाही शालेय साहित्य घेण्यासाठी तेली सेनेचे कार्यकर्ते आपल्याकडे येईल.अशी माहिती गणेश पवार यांनी दिली आहे. संपर्क:अक्षयदीप प्लाझा शॉप नंबर 134,सिडको जालना रोड औरंगाबाद, सरपशीहरिुरी992223सारश्र.लेा व्हॉटस्अॅप नंबर,9922234621.
Leave a comment