बोरगांव बाजार । वार्ताहर
सिल्लोड तालुक्यातील सोनाप्पावाडी व सावखेडा परिसरात शनिवारी राञीच्या 11.30 वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वार्यासह पाऊसाने हजेरी लावल्यामुळे अनेक मका पिक झाले आडवी, सोनाप्पावाडी व सावखेडा परिसरात शनिवार राञी 11.30 वाजे दरम्यान अचानक वादळी वार्यासह पाऊसाने सुरूवात केली व अर्ध्या-पाऊण तासात सर्व परिसरात पाऊस कमी व सोसाट्याचा वादळी वारा जास्त होता.
या वादळीवार्याने सोनाप्पावाडी मधील गट क्रं.330 प्रदीप घासीराम कवाळ व गट क्रं.366 मन्साराम येडुसिंग बेडवाल याचे चांगले बहारत आलेले मका पिक पुर्ण जमिनदोस्त करुन टाकले आहे,याच बरोबर परिसरात इतर शेतकर्यांचे बरेच मोठे नुकसान झालेले दिसुन येत आहे,व या वार्यामुळे आडव्या पडलेल्या मकाला पडल्यामुळे दाणे (कणीस) लागणे मुश्कील आसल्यामुळे शेतकर्यांपुढे हे नवीन संकट उभे ठाकले आहे,यामुळे हे आडवी पडलेली मका धड चारा,नाधड माल या अशा परिस्थिती हे पिक नष्ट करुन त्याजागी कोणते पिक पेरावे यामुळे शेतकर्यांच्या आर्थिक अडचणीत आणखी भर पडल्याचे चिञ सोनाप्पावाडी व सावखेडा परिसरात दिसुन आले आहे, तरी संबधीत महसुल व पंचायत विभागाने नुकसाग्रस्त शेतकर्यांच्या नुकसान ग्रस्त पिकाची पाहणी करून पंचनामे करावे अशी मागणी आसाराम बेडवाल, गोवर्धन महेर, शिवा बारवाळ, लखिचद कवाळ, मन्साराम बेडवाल,महाजन महेर, आनंद लखवाळ, प्रभु लखवाळ, संग्राम लखवाळ, यासह शेतकर्यांतुन होत आहे.
Leave a comment